35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता टिपागड दलमचा डीव्हीसी यशवंत बोगा यास पत्नीसह अटक

टिपागड दलमचा डीव्हीसी यशवंत बोगा यास पत्नीसह अटक

0
197
file photo

blank

गडचिरोली,दि.११: नक्षल्यांच्या टिपागड दलमचा विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) यशवंत बोगा यास त्याची पत्नी शारदाला पोलिसांनी अटक केली.

यशवंत उर्फ दयाराम बोगा(३५) हा २००९ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. सद्या तो टिपागड दलमचा डीव्हीसी होता. त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ७८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ६ पोलिसांसह १८ खून व १० जाळपोळीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. १ मे २०१९ मध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा झालेल्या भूसुरुंगस्फोटात त्याचा मुख्य सहभाग होता. शिवाय ३५ पोलिस-नक्षल चकमकीतही तो सहभागी होता. शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

यशवंत बोगाची पत्नी शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम(३२) हिच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये ४७ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.विकासाच्या आड येणाऱ्या नक्षल्यांना पोलिस विभागाकडून चोख प्रत्युतर दिले जाईल. त्यामुळे नक्षल्यांनी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.

blank