33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस शिपायाने केले विषप्राशन

ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस शिपायाने केले विषप्राशन

0
731

blank

वर्धा,दि.13: जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. केतन बावणे या पोलीस कर्मचाऱ्याला ठाणेदार हे वेळोवेळी त्रास देत होते त्यामुळे त्याने ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी आस्था बावणे हिने केला आहे.

blank