
गोंदिया,दि.14 : पालकमंत्री अनिल देशमुख हे 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 15 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता नागपूर येथून शासकीय मोटारीने गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सकाळी 8.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व सकाळी 9.05 वाजता राष्ट्रध्वजारोहण करतील व उपस्थितांना शुभेच्छा देतील. सकाळी 9.20 वाजता मान्यवरांच्या भेट घेतील. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद येथे महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरावरील महिला व बाल विकस भवनाचे उद्घाटन करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संबंधाने बैठक घेतील. सकाळी 11.30 वाजता कोरोना विषाणू उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. दुपारी 1 ते 3 वाजतापर्यंत राखीव असून सोईनुसार गोंदिया येथून कोहमारा मार्गे नागपूरकडे प्रयाण करतील.





