38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तुमसर तहसील कार्यालयातुन कोरोना निधीची बोगस बिलाद्वारे उचल

तुमसर तहसील कार्यालयातुन कोरोना निधीची बोगस बिलाद्वारे उचल

0
519

भंडारा दि १९:: माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोरोनाचा संकटकाळात केंद्र सरकारने तथा राज्य शासनाने कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण किती निधी उपलब्ध करुन दिला होता आणि तो निधी कोणत्या ठिकाणी किती खर्च करण्यात आला. याबाबत तपशिल मुद्देसूद सविस्तर माहिती माहितीचा अधिकार अंतर्गत तुमसर तहसील कार्यालयाला मागण्यात आली होती.
तहसील कार्यालयाचा सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार तुमसर शहर व तालुक्यात किराणा सामान आणि इतर साहित्य पुरवठा धारकाने खरेदी करून पुरवठा केला असल्याची माहिती ६५ पेजच्या कागदपत्रांसह दिली. मात्र खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांची दुकाने तुमसर येथे अस्तित्वात नाही असे माहितीचा अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार निदर्शनास आले. यामुळे यात आर्थिक अनियमितता झाली असल्याची दाट शक्यता आहे.
तुमसर तहसील कार्यालयाने कोणतीही शहानिशा ‘न’ करता सदर लाखो रुपयांचे बिल मंजूर करण्यात आले. याप्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करून पुरवठा धारक व संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेकडून जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.

blank