38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारला गोंदिया-भंडारा जिल्ह्यात

0
615

blank

गोंदिया,दि.20ः- राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या शुक्रवारला(दि.21) कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.सकाळी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोवीड सेंटरला भेट देणार असून त्यानंतर आढावा बैठक घेणार आहेत.दुपारी 3 वाजता गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.त्यानंतर 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाता आढावा बैठक घेणार आहेत.विरोधी पक्ष नेत्याच्या आगमनाचे चित्र स्पष्ट होताच जिल्हा प्रशासन आपल्याला सावरण्याच्या कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

blank