33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात आणखी 44 कोरोना पॉझिटिव्ह;गोंदियात सर्वाधिक 40 रुग्ण

जिल्ह्यात आणखी 44 कोरोना पॉझिटिव्ह;गोंदियात सर्वाधिक 40 रुग्ण

 : 26 बाधितांची कोरोनावर मात जिल्ह्यात 134 कॅटेंटमेंट झोन

0
2216

blank

गोंदिया दि.21 (जिमाका) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.आज 21 ऑगस्ट रोजी 44 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.तर दुसरीकडे कोरोनावर उपचारातून मात करणारे रुग्णही वाढत आहे. उपचारातून बरे झाल्याने 26 रूग्णांना आज सुट्टी देण्यात आली.त्यामुळे ही थोडी समाधानाची बाब आहे.

प्रयोगशाळा चाचणीतून जिल्ह्यातील 749 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 205 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.यामध्ये काही रुग्णाच्या दोन्ही चाचण्या करण्यात आल्यामुळे नमुन्यांची संख्या ही वाढली आहे. एकूण पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या 954 झाली आहे.तर बाधित रूग्णांची संख्या 947 वर पोहचली आहे.

जिल्ह्यात आज जे 44 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे यामध्ये गोंदिया तालुक्यातील 40 रुग्ण आहे. यामध्ये गोंदिया शहरातील सिव्हील लाईन, रेलटोली,गौतमनगर, यादवनगर,फ्रेंड्स कॉलोनी,टीबीटोली, गांधी वार्ड,अरिहंत कॉलोनी येथील प्रत्येकी एक रुग्ण,शास्त्री वार्ड येथे तीन रुग्ण, छोटा गोंदिया येथे दोन रुग्ण,प्रताप वार्ड स्टेडियम येथे पाच रुग्ण,विवेकानंद कॉलोनी येथे दोन रुग्ण,तालुक्यातील कारंजा येथे सात,कटंगी येथे सात,फुलचुर येथे तीन,खमारी येथे एक,कुडवा येथे एक आणि एक रुग्ण सेजगाव(नवरटोला) येथील आहे.तिरोडा तालुक्यात तीन रुग्ण आढळले असून दोन रुग्ण तिरोडा आणि एक रुग्ण परसवाडा (गोंडमोहाडी) येथील आहे.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे दोन रुग्ण आढळले आहे.

कोरोना संसर्ग झालेले आज जे 44 रुग्ण आढळले आहे.या रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या 947 झाली आहे. क्रियाशील बाधित रुग्ण आता 239 झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 947 आहे.यामध्ये बाधित आढळलेले रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -370 तिरोडा तालुका-257,गोरेगाव तालुका -30, आमगाव तालुका -71, सालेकसा तालुका -38,
देवरी तालुका -40, सडक/अर्जुनी तालुका -54,अर्जुनी /मोरगाव तालुका – 82 बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -5 रुग्ण आहे.

कोरोनावर मात करून जिल्ह्यातील 696 रुग्ण घरी गेले आहेत. यामध्ये गोंदिया तालुका -254 ,तिरोडा तालुका -217, गोरेगाव तालुका -15,आमगाव तालुका -41, सालेकसा तालुका -28,देवरी तालुका -38, सडक/अर्जुनी तालुका – 42, अर्जुनी/मोरगाव तालुका -57 आणि इतर – 4 असे एकूण 696 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता 239 झाली असून ती तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.गोंदिया तालुका- 111,तिरोडा तालुका-34, गोरेगाव तालुका -15, आमगाव तालुका -30, सालेकसा तालुका -10, देवरी तालुका -2, सडक/अर्जुनी तालुका -11, अर्जुनी/मोरगाव तालुका -25 आणि इतर – 1 असे एकूण 239 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. जिल्ह्यात 239 क्रियाशील रुग्ण उपचार घेत असून 4 रुग्ण हे नागपूर येथे उपचार घेत आहे.

विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 749 रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 205असे एकूण 954 नमुने पॉझिटिव्ह आढळले.

ज्या रुग्णांनी कोरोनावर आज मात केली अशा रुग्णांची संख्या 26 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -11, तिरोडा तालुका-8,आमगाव तालुका-4, गोरेगाव तालुका -2,आणि एक रुग्ण बाहेर जिल्ह्यातील आहे. एकूण 696 रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 13694 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 12406 नमुने निगेटिव्ह आले. तर 749 नमुने पॉझिटिव्ह आढळून आहे. 183 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 356 नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.

संस्थात्मक विलगिकरण कक्षात 871 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 98 व्यक्ती अशा एकूण 969 व्यक्ती विलगिकरणात आहेत. हया सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची नियमीत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 8266 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 8061 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.205 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 98 चमू आणि 74 सुपरवायझर 134 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

blank