
देवरी(सुभाष सोनवाने)दि.22:-तालुक्यातील देवरी-चिचगड-कोरची हा राष्ट्रीय महामार्ग महत्वाचा मार्ग असतानाही शहरातून जाणार्या या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या या तालुक्यातील हा महत्वाचा रस्ता असून या रस्त्याने दररोज महत्वाचे वरिष्ठ अधिकारी ये-जा करतात.त्यातच याच मार्गावर पोलीस ठाणे,आदिवासी प्रकल्प कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालये आणि शाळा महाविद्यालये आहेत.परंतु जेव्हा केव्हाही रस्त्याचे बांधकाम किंवा दुरुस्ती हाती घेतले जाते त्यावेळी बांधकामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यावर जागोजागी खडडे पडल्याचे चित्र बघावयास मिळते.येथील राणी दुर्गावती चौकापासून तर मनोरहभाई पटेल शाळेपर्यंतच्या रस्ता बघितल्यास या रस्त्यावर खड्याशिवांय काहीच दिसत नसल्याने रस्त्यावरखड्डे म्हणण्यापेक्षा खड्यात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.





