34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता औषध फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

औषध फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

0
1007

blank

तिरोडा,दि.25ः तालुक्यातील सातोणा येथील स्वत:च्या शेतात सतत दोन दिवस विषारी औषधाची फवारणी केल्याने एका शेतकऱ्याला विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. राजू रामदास रहांगडाले (47,रा.सातोना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.शेतकरी राजू रामदास रहांगडाले (४७) हे शेतकरी दिनांक २३ रोजी संपूर्ण दिवसभर आपल्या शेतात धान पिकावर औषध मारीत होते. दुसऱ्या दिवशीही ते शेतात गेले होते. शेतात औषध मारुन १२ वाजता घरी परत आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरचे लोकांनी ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरीता आणले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी २.१५ मिनिटांचे दरम्यान त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय तिरोडा तर्फे पोलिसांना देण्यात आल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.

blank