34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत एक महीला नक्षली ठार

गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत एक महीला नक्षली ठार

0
493
file photo

blank

गडचिरोली,दि.26ः जिल्ह्याच्या जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलांडा गावालगत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाल्याची घटना आज (दि.26)घडली.सी-60 जवानांच्या पथकासोबत झालेल्या चकमकीत प्लाटुन दलमच्या महीला नक्षलीला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.चकमकीचे घटनास्थळ छत्तीसगडच्या सीमेला लागून असुन मृतदेहासह मोठया प्रमाणात साहित्य सापडल्याचे प्राथमिक वृत्त पोलिस सुत्रांनी दिले आहे.सी-60 जवानांचे कोंबीग आपरेशन परसिरात सुरु आहे.

blank