
गोंदिया,दि.28: जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यातच आज गुरुवारला जिल्ह्यातील 6 तालुक्यात व 24 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.तर हवामान विभागाने गोंदिया व भंडारा जिल्ह्याला रेड अर्लटचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील देवरी मंडळात 141.50 मिमी व ठाणा मंडळात 164 मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.तर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.पावसामुळे जिल्ह्यातील 8 रस्त्यांवरील वाहतुक बंद पडली आहे.यातील सर्वाधिक रस्ते देवरी तालुक्यातील आहेत.जोरदार पावसामुळे नवेगावबांध येथील तलाव ओव्हरफ्लो झालेले आहे.तर भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध जलाशय गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो यावर्षी झालेले आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असून सततधार पडत आहे. सालेकसा तालुक्यातील कालीसराड धरणाचे 4 दरवाजे (गेट) 1 फुटाने उघडण्यात आले आहेत. पुजारीटोला धरणाटा जलस्तर वाढल्याने 12 दरवाजे (गेट) 1 फुटाने ,मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचा एक दरवाता 1 मीटरने उघडम्यात आलेला आहे. बंद रस्त्यामध्ये 1.आवरीटोला ते गोटाबोडी मार्ग
2.पंढरवानी ते कन्हाळगाव मार्ग
3.रोपा ते पलांदुर मार्ग
4.परसोडी ते .सा. क्रमांक 12 आलेवाडा मोहगाव ते गडेगाव मार्ग बंद आहे.
5.परसोडी ते गडेगाव मार्गावर पुलाच्या बरोबर पाणी आहे. पाऊस सतत सुरू असल्यास बंद होण्याची शक्यता आहे.
6.शिलापुर -फुक्किमेटा- पुराडा मार्ग बंद
7.अंभोरा साजा क्रमांक 13 अंतर्गत निलज खामखुरा मार्ग बंद त्याचप्रमाणे आमगाव तालुक्यातील पिपरटोला-चिचटोला हा मार्ग सुध्दा बंद पडलेला आहे.सालेकसा तालुक्यातील दरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे बंजारीकडे जाणार्या रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्यामुळे गावात पाणी शिरण्याची भिती निर्माण झाली आहे.





