
तिरोडा,दि.29ः अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा सुपोषण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 2020 ते 7 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये अदानी पावर प्रमुख कांती बीश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 नियमावलीचे पालन करून स्तनपान सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत स्तनदा,गरोदर मातांना आहार, स्तनपान, बाळाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पोस्टर प्रदर्शनी ,व्हिडिओ शो ,सामूहिक चर्चा, गृहभेटी आणि भ्रमणध्वनीद्वारे समुपदेशन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले.गावातील महिलांकरिता चित्रकला, घोषवाक्य, निबंध यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील 35 गावांमध्ये विविध कार्यक्रमात 441 महिला, गरोदर माता, स्तनदा माता, युवती यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अदानी फाउंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांच्या नेतृत्वात सुपोषण कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी स्वप्निल वाहने तसेच महिला कार्यक्रम अधिकारी दीपा बेद्रे व प्रीती उके यांनी परिश्रम घेतले.





