33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ 56 नव्या बाधित रुग्णांची भर, 74 रूग्णांची कोरोनावर मात

56 नव्या बाधित रुग्णांची भर, 74 रूग्णांची कोरोनावर मात

आतापर्यंत आढळले 1367 रुग्ण जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण 475

0
433

blank

गोंदिया दि.29 -: आज प्रयोगशाळा आणि अँटिजेन अहवालातून जिल्ह्यात 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उपचारातून 74 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 56  पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 1367 झाली आहे.  कोरोना बाधित रुग्ण आज जे आढळून आले आहेत. त्यामध्ये गोंदिया तालुक्यात 36 रुग्ण असून गोंदिया शहरातील रिंग रोड (मनोहर वार्ड)-एक रुग्ण,गंजवार्ड – एक रुग्ण, सावराटोली येथील सात रुग्ण,कामठा येथील एक रुग्ण, दासगाव येथील एक रुग्ण,आरटीओ ऑफिसच्या मागे एक रुग्ण,पंचायत समिती कॉलनी एक रुग्ण,रेलटोली येथील एक रुग्ण,आयटीआयच्यामागे एक रुग्ण,गणेशनगर येथे एक रुग्ण, छोटा गोंदिया येथे एक रूग्ण,यादव चौक येथे तीन रुग्ण, फुलचूर येथे एक रुग्ण, वसंतनगर येथे एक रुग्ण, रामनगर येथे दोन रुग्ण,डांगोर्ली येथे दोन रुग्ण, चारगाव येथे सहा रुग्ण, रापेवाडा व श्रीनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे.

तिरोडा तालुक्यात बारा रुग्ण आढळले असून शहरातील दहा रुग्ण हे सुभाष वार्ड व एक रुग्ण हा रविदास वार्ड आणि एक रुग्ण मुरमाडी येथील आहे. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील रुग्ण, आमगाव तालुक्यातील ठाणा येथील एक रुग्ण, बनगाव वार्ड क्रमांक 3 येथील दोन रुग्ण, सालेकसा येथील एक रुग्ण, सडक-अर्जुनी येथील एक रुग्ण आणि अर्जुनी/मोरगाव येथील दोन रुग्ण अशा एकूण 56 रुग्णांचा समावेश आहे

ज्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा ती व्यक्ती ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली आहे,अशा व्यक्तींची  विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येते.आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून 1082 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 317 नमुने असे एकूण 1399 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.तर बाधित रूग्णांची संख्या 1367 झाली आहे.

जिल्ह्यात आज जे 56 कोरोना बाधित आढळून आले.सर्वाधिक 36 रुग्ण हे गोंदिया शहर व तालुक्यातील आहे. बाधित आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -677,तिरोडा तालुका-299, गोरेगाव तालुका -37, आमगाव तालुका -87, सालेकसा तालुका-44, देवरी तालुका -48, सडक/अर्जुनी तालुका -68, अर्जुनी /मोरगाव तालुका – 89 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -18 रुग्ण आहे, असे एकूण 1367 रुग्ण बाधित आढळले आहे.

आतापर्यंत 875 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका- 328, तिरोडा तालुका -246, गोरेगाव तालुका -33, आमगाव तालुका -54, सालेकसा तालुका -38, देवरी तालुका-40, सडक/अर्जुनी तालुका – 53, अर्जुनी/मोरगाव तालुका -79 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण 475 आहे. तालुकानिहाय ते पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 341,तिरोडा तालुका-46, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -32, सालेकसा तालुका -6, देवरी तालुका-8, सडक/अर्जुनी तालुका -14, अर्जुनी/मोरगाव तालुका -10 आणि इतर – 14 असे एकूण 475 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी 467 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात तर 8 रुग्ण हे नागपूर येथे उपचार घेत आहे.

क्रियाशील रुग्णांपैकी 62 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका – 39, तिरोडा तालुका-05,गोरेगाव तालुका -00, आमगाव तालुका – 10, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका – 00, सडक/अर्जुनी तालुका- 06, अर्जुनी/मोरगाव तालुका – 00  असे एकूण 62 क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

कोरोनावर ज्या रूग्णांनी आज मात केली आहे अशा रुग्णांची संख्या 74 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -41, तिरोडा तालुका -8, गोरेगाव तालुका -00, आमगाव तालुका-00, सालेकसा-00,देवरी तालुका-00, सडक/अर्जुनी तालुका-9 आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील 16 रुग्ण आहे. आतापर्यंत 875 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 15818 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 14122 नमुने निगेटिव्ह आले. तर 1082 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 174 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 459 नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 35 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 827 व्यक्ती अशा एकूण 862 व्यक्ती विलगिकरणात आहेत.

कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 10366 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 10049 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 317 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 57 चमू आणि 46 सुपरवायझर 44 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका -05, आमगाव तालुका -06, सालेकसा तालुका -05, गोरेगाव तालुका -03, देवरी तालुका-05, सडक/अर्जुनी-03, तिरोडा तालुका- 16 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-1असे एकूण 44 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

blank