36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर;जिल्हाध्यक्ष मानकर यांनी केली घोषणा 

भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर;जिल्हाध्यक्ष मानकर यांनी केली घोषणा 

0
739

blank

गोंदिया, ३० ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी आज, ३० ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी प्रदेश सचिव संजय पुराम, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर उपस्थित होते. कार्यकारिणीमध्ये ११ उपाध्यक्ष, ११ सचिव, ३ महामंत्री, १ कोषाध्यक्ष यासह कायम निमंत्रित सदस्य २६, विशेष निमंत्रित २४ व जिल्हा कार्यकारिणी सदस्य ९९ याप्रमाणे १८० पदाधिकाèयांचा समावेश आहे. सोबतच जिल्हा आघाडी युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा व सेलच्या अध्यक्ष, महामंत्री यांच्या नावांची घोषणा केली.

blank