43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता मोका फरार आरोपी जुल्पेकार जब्बार गणी 4 वर्षानंतर गोंदिया पोलिसांच्या ताब्यात

मोका फरार आरोपी जुल्पेकार जब्बार गणी 4 वर्षानंतर गोंदिया पोलिसांच्या ताब्यात

0
2280

blank

गोंदिया,दि.31ः-  मोका गुन्ह्यातील फरार आरोपी व टोळीप्रमुख जुल्पेकार ऊर्फ छोटू जब्बार गणी यास मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.रेतीतस्कर,सरकारीअधिकारी कर्मचारी वर प्राणघातक हल्ले शस्त्राचा वापर करून असे गुन्हेस्वरुपातील काम केलीहोती त्यात २०१६ मध्ये मोका त्या गुन्ह्यात फरार झालेला होता त्यास ४ वर्षानंतर काल रात्री अटक केली आहे न्यायालयात हजर करून ३ सप्टेबरपर्यत पीसीआर घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यानी पत्रपरिषदेत दिली.कोरोना काळात पोलिसांनी गेल्या 4 वर्षापासून फऱार असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला जाळ्यात अडकवल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.आरोपी जुल्पेकार जब्बार गणी वर गोंदिया शहर,रामनगर,रावणवाडी व नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.30 आॅगस्टच्या रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आरोपीला आरोपीची बहिण बालाघाट शहरातील इतवारी बाजार परिसरात वास्तव्यास असलेल्या घरातून ताब्यात घेण्यात आले.गणीवर कलम 302,319,325,34,184, 307,24,143,148,149,कलम 35 मपोका,138,324,143,342,294, 363,364(अ),506,376(2)9एन), 120(ब),88,82,309,341,352 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम 1999 कलम 3(1) 3(2) 3(4), वन्यजीव सरंक्षण अधि.कलमसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक  रमेश गर्जे,कर्मचारी लिलेंद्र बैस,चंद्रकात कर्पे,राज बंडीवार,रुपराम पटले,संजय हुड,दिनेश लोधी,प्रविण चामट.विनोद हरिणखेडेचे पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

blank