41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पुरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने दया—नाना पटोले

पुरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने दया—नाना पटोले

Ø  जिल्हयात मोठया प्रमाणावर शोध व बचाव कार्य सुरु Ø  18 हजार लोकांना सुरुक्षित स्थळी हलविले

0
177

blank

भंडारा, दि. 31 : –  अचानक उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्हा प्रशासन बचाव व शोध कार्यात सज्ज असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती दलाच्या सहकार्याने जिल्हयातील 4200 कुटूंबातील 18 हजार लोकांना तात्पुरत्या शिबीरात हालविण्यात आले आहे. या शिबीराला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज भेट दिली. तसेच भंडारा शहरातील पुरग्रस्त भागाची पाहणी सुध्दा केली. तात्पुरत्या शिबीरातील नागरिकांची अँटीजेन तपासणी करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, भोजनाची व्यवस्था करणे यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना  नाना पटोले व विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते.

भंडारा शहर 5, भंडारा ग्रामीण23, पवनी 22 तुमसर 5, मोहाडी6 व लाखांदूर 2  असे तात्पुरते शिबीर उभारण्यात आले आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 163 सदस्य विविध भागात 30 बोटीच्या सहाय्याने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचवित आहेत. आता पाणी वाढणार नसून नागरिकांनी घाबरुन न जाता सहकार्य करावे. प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत केली जाईल, अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली.

 राजय प्रतिसाद दलाच्या 2 चमु जिल्हयात दाखल झाल्या आहेत. मोठया प्रमाणात शोध व बचाव कार्य सुरु आहे. जिल्हयात 2 हजार 645 कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

भंडारा शहरात निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असून अभिषेक नामदास यांनी बचाव व शोध कार्यातंर्गत 150 कुटूंब सुरक्षित ठिकाणी पोहचविले आहे. आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

जवाहर नगर-पिंपरी येथे एसडी आरएफ पथकाद्वारे 600 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच मोहाडी व तूमसर तालुक्यात एसडीआरएफच्या दुसऱ्या चमुद्वारे 700 लोकांना सुरक्षित ठिकाणी हल विण्यात आले आहे. सदरच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी व सर्व तहसिलदार यांनी मागील 36 तासादरम्यान शोध व ब चाव कार्य करुन परिस्थितीवर प्रशासन नजर ठेवून आहे.

सर्वांना तात्पुरत्या राहण्याची व्यवस्था व भोजन देण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे व्यवस्था केली आहे.जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात जिल्हयात 11 बोट द्वारे शोध व बचाव कार्य करण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा पूरपस्थिती सद्यस्थिती भंडारा तालुका– टाकळी-14 कुटूंब, तिड्डी-32 कुटूंब, गणेशपूर-27 कुटूंब,भोजापूर-47 कुटूंब, लोहारा-497 लोक, पेवठा-350 लोक, कोंढी-4 कुटूंब, करचखेडा-22 कुटूंब, खमारी-15 कुटूंब, कोथुर्णा-82 कुटूंब,   कारधा-390,खैरी-1 कुटूंब, करचखेडा- 10 कुटूंब, दवडीपार बेला- 30 कुटूंब, पिंडकेपार-30 कुटूंब, कोरंभी-31 कुटूंब, सालेबर्डी- 18 कुटूंब, आमगाव-1 कुटूंब, खैरी-9 कुटूंब, मोटोरा- 3 कुटूंब, खापा सालबर्डी-7 कुटूंब, पिपरी-120 कुटूंब,  एकूण 3811 , नुकसानग्रस्त व्यक्ती 13  हजार 811 व आपत्ती केंद्र 24 आहेत.

पवनी तालुक्या-मांगली चौरास-90 कुटूंब, ईसापूर-50 कुटूंब, उमरी-40 कुटूंब, पौना बुज-10 कुटूंब, भोजापूर-32 कुटूंब, रुयाड 60 कुटूंब, जुनोना-3 कुटूंब, कुर्झा-78 कुटूंब, ईटगाव-40 कुटूंब, कोरंभी-10 कुटूंब, रेवनी-4 कुटूंब, विलम-6 कुटूंब, खातखेडा-4 कुटूंब, वलनी-2 कुटूंब, शिवनाळा-4 कुटूंब, वडेगाव-2 कुटूंब, बाम्हणी-2 कुटूंब, पवनी-3 कुटूंब, येनोडा-3 कुटूंब, कोदुर्ली-30 कुटूंब असे एकूण1479 कुटूंब, नुकसानग्रस्त व्यक्ती 7274 व आपत्ती केंद्र 27 आहेत.

तुमसर तालुका- तामसवाडी-47 कुटूंब, पांजरा-15 कुटूंब, सितेपार-25 कुटूंब, परसवाडा-20 कुटूंब, रेंगेपार-20 कुटूंब असे एकूण 127  कुटूंब, नुकसानग्रस्त व्यकती 528 व आपत्ती केंद्र 5 आहेत.

मोहाडी तालुका- बेटाळा-7, मुंडरी बु.85 कुटूंब, मुंढरी खु. 45 कुटूंब, देव्हाडा-14 कुटूंब, निलज खुर्द-3 कुटूंब, हिवरा-10 कुटूंब एकूण 403 कुटूंब, नुकसानग्रस्त व्यक्ती 1712 व आपत्ती केंद्र 7 आहेत.लाखांदूर तालुका- मोहरणा -40 कुटूंब, इटान 17 कुटूंब एकूण 6 हजार 426 कुटूंब,नुकसानग्रस्त व्यक्ती 26 हजार 4 असून आपत्ती केंद्र 78 आहेत.  साकोली व लाखनी  आपत्ती झालेली नाही.

blank