
अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.03ः जनावरांना निर्दयीपणे कोंडून कंटेनरमधून वाहतूक करणार्या वाहनाला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना 1 सप्टेंबरच्या सकाळी घडली.पोलिसांनी 14 लाख 60 हजारांचा ऐवजांसह कंटेनर ताब्यात घेतले आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर ला अर्जुनी-मोर तालुक्यातील कोरंबी चारभट्टी मार्गाने पांढऱ्या रंगाच्या कंटेनर ट्रक मध्ये अवैधपणे जनावरे भरून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक महादेव तोडले श्रीकांत मेश्राम,विजय कोटांगले,योगेश मुनेश्वर,प्रवीण बेहरे तसेच कोरंबी येथील 2 पंचांसमक्ष कोरंबी ते चारभट्टी मार्ग पूयार कडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करीत असतानाच अवैधपणे जनावरे भरून वाहतूक करणारा कंटेनर दिसून येताच थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन वेगाने चालवून पोलीस शिपायाच्या खाजगी वाहनाला धडक मारत जनावरे भरलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये अडकला. पहाटेची वेळ असल्याने चालक व वाहक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. कंटेनरची चौकशी केली असता ट्रक क्रमांक सीजी 8 एजे 70 29 मध्ये मागच्या भागात म्हशी कोंबून भरल्याचे दिसून आले एकूण तेरा मशी दाटीवाटीने भरलेल्या होत्या त्यापैकी सहा मसी घटनास्थळावर मृत्युमुखी पडलेल्या होत्या.वीस हजार प्रमाणे दोन लाख 60 हजार रुपये किमतीचा माल जनावरे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर 12 लाखांचा असा 14 लाख 60 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
निर्दयीपणे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करण्याचा आरोपावरून कलम 11(1)(घ)(ड)प्रा नि वा कायदा सन 1960 122 मोवाका अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस शिपाई मेश्राम यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस शिपाई विजय कोटांगले पुढील तपास करीत आहेत.





