
गोंदिया,दि.03ः-गोंदिया विधानसभा क्षेत्रात ‘लंपी स्कीन डिसीज’ हा जनावरांचा रोग मोठया प्रमाणात पसरत आहे. हा त्वचा रोग थांबविण्याच्या दृष्टीने पंचायत समिती गोंदिया येथे आढावा बैठक आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गोंदिया पंचायत समिती क्षेत्रात लंपी स्कीन या रोगाचा प्रसार वाढू पाहत आहे. शेतकऱ्यांपुढे हे आलेले एक गंभीर संकट आहे. यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. आर. बी. गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया पंचायत समिती क्षेत्रात पशुसंवर्धन विभागात मनुष्यबळ कमी असल्याने गावोगावी वेळेवर पोचणे अवघड होतं चालले आहे. पंचायत समिती क्षेत्रात एकूण 49 कर्मचारी नियुक्ती केली जाणार होती,मात्र सद्यस्थितीत 36 नियुक्ती केली असून 12 पदे अद्याप रिक्त आहेत. जर मनुष्यबळ वाढवलं गेलं तर लंपी सारख्या रोगांपासून घडण्यास अधिक सोपे जाऊन वेळेवर गावात पोहोचून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकते.
या संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांनी पशुवैद्यकीय आयुक्त सचिंद्र प्रताप यांच्याशी चर्चा करून या रोगावरील लस, औषध आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठी आग्रह केले असता सचिंद्र प्रताप यांनी या मंत्रालयात पाठपुरावा सरु असल्याची माहिती दिली.सदर बैठकित खंड विकास अधिकारी जावेद इनामदार, तालुका के पशुसंवर्धन विभाग के उपायुक्त डॉ. संजय गायगवली, सहायक आयुक्त डॉ. आर. बी. विराम, पशुधन विकास अधिकारी डॉ. नीलम वावड, डॉ. विविधा चराटे, डॉ. जितेंद्र गोस्वामी, डॉ. विशाल आडे, डॉ. राकेश गोडे डॉ. विवेक गजरे, डॉ. विशाल आडे, डॉ. दि. शा. कडू, डॉ. ए. डी. जाऊळकर, सहायक पशुधन विकास अधिकारी मोहन डोंगरवार व अन्य कर्मचारी, तसेच वाविम विभागचे अधिकारी, कर्मचारी, पशुसखी, पशुमित्र उपस्थित होते.





