41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय तुमसर व मोहाडी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सर्वेक्षण त्वरीत करा-खासदार पटेल

तुमसर व मोहाडी तालुक्यातील पुरग्रस्तांचे सर्वेक्षण त्वरीत करा-खासदार पटेल

0
91

blank

तुमसर/मोहाडी,दि.05ः-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात माडगी, पिपरी चुन्नी, उमरवाडा, तामसवाडी, सुकडी (नकुल) आणि मोहाडी तालुक्यात ढिवरवाडा, मुंढरीसह इतर ठिकाणी पुरग्रस्त नागरिकांची खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेत पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शासनाच्या मोबदल्या पासुन कोणतेही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहता कामा नये त्यासाठी सर्व नुकसानग्रस्त ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण व पंचनामे व्हावे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना खा. पटेल यांनी दिले. खा. पटेल यांच्या सोबत आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे,माजी खासदार मधुकर कुकडे,धनंजय दलाल,विठ्ठल कहालकर,देवचंद ठाकरे,विठ्ठल रहमतकर,रमेश पारधी,राजू माटे,माजी सभापती धनेंद्र तुरकर,रेखा ठाकरे,ठाकचंद मुंगुसमारे,गजानन लांजेवार,शिशुपाल गौपाले,प्रेरणा तुरकर,जितू तुरकर,राजेंद्र ढबाले,रामेश्वर मोटघरे,गुशुलाल बघेले,शंकर राऊत,कुसुम कांबळे,महेश रहांगडाले तसेच मोहाडी तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,वासुदेव बांते,चंदु सेलोकर, महादेव पचघरे, महादेव फुसे, के.बी.चैरागडे, विजय पारधी, प्रदीप बुराडे, सदाशिव ढेंगे, श्रीधर हटवार सोबत अनेक नागरिक उपस्थित होते.

blank