41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदिया नगरपरिषदेतील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया नगरपरिषदेतील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

0
738

blank

गोंदिया,दि.०८:: गोंदिया नगरपरिषदेतील स्थापत्य अभियंता संतोष विठ्ठलराव ठवरे यांनी गोरेगाव नगर पंचायत येथे स्थापत्य अभियंत्याकरीता कागदपत्रासह अर्ज केलेल्या व्यक्तीकडून शिफारस करण्याकरीता 8 हजाराची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज मंगळवारला गोंदिया नगरपरिषद कार्यालयात सापळा रचून संतोष ठवरे यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले.तक्रारदाराकडे 10 हजाराची मागणी केली असता ती द्यायची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीवरुन पडताळणी केली असता 8 हजार रुपयात तडजो़ड झाल्यानंतर आज सापळा रचून ठवरे यांना लोकसेवक पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी अटक कऱण्यात आली आहे.

blank