जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडें कोरोना पाॅझिटिव्ह

0
18346

गोंदिया,दि.08ः-गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असून वरिष्ठ अधिकार्यांनाही लागण झालेली असतानाच आज गोंदिया जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे.आरोग्य विभागाने यासंदर्भात पुष्टी केली असून जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवड़े यांनी स्वतःला होमक्वरांटाईन करुन घेतले असून संपर्कात आलेल्या सर्वांना आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.यापुर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले हे सुध्दा पाॅझिटिव्ह आलेले होते.मिळालेल्या माहितीनुसार विशेष समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांचाही अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. अनेक अधिकारी हळूहळू पाॅझिटिव्ह येत असल्याचे चित्र समोर येत आहे.