35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्षपदी जितेश राणे

काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्षपदी जितेश राणे

0
161

blank

गोंदिया,दि.09: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशावर महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस किसान आघाडीच्या अध्यक्षपदी युवा स्वाभिमान पक्ष सोडून आलेले जितेश राणे यांची नियुक्ती केली आहे. जितेश राणे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस उपाध्यक्ष व गोंदिया जिल्हा प्रभारी महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेवराव किरसान, आमदार सहषराम कोरोटे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिले आहे. येत्या काही दिवसात जिल्हा किसान काँग्रेस आघाडीची कार्यकारिणी गठित करुन शेतकèयांच्या समस्या सरकारसोबत पक्षाकडे पोहोचविणार असल्याची ग्वाही जितेश राणे यांनी दिली आहे.

blank