महाराष्ट्र Archives - Berar Times

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान
नवी दिल्ली, दि. 6: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ने गौरव करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देशभरातील ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षक, अशा एकूण ८२ शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देबाश्री मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिक्षकांचा सन्मान हाच प्रगत समाजाचा पाया

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करताना राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या समर्पणाचे त्यांनी कौतुक केले.

भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचे उल्लेखनीय कार्य

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या तीनही क्षेत्रांत महाराष्ट्रातील या शिक्षकांनी आपल्या कार्यातून शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देतानाच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना, संशोधन आणि रोजगाराभिमुख कौशल्यनिर्मिती यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

शालेय शिक्षण क्षेत्र-डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २९ वर्षांपासून डॉ. कविता गिट्टे यांनी अथक कार्य केले आहे. प्रतिकूल सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी ‘पालक रक्षक’ आणि ‘शिक्षण आपल्या दारी’ यांसारखे अभिनव उपक्रम राबवले. ऊसतोड छावण्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून हजारो मुलांना शिक्षणाशी जोडण्याबरोबरच त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी आणि उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक

नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यंत्रमानव तंत्रज्ञान, सहाय्यक तंत्रज्ञान आणि डिजिटल अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर सुरू केला. वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.

वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर

गणित विषयाची विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून तो अधिक सोपा आणि आनंददायी करण्यासाठी वैभव कुलकर्णी यांनी खेळणी व कलांच्या माध्यमातून गणित शिकविण्याची अभिनव पद्धत विकसित केली. दैनंदिन जीवनातील उदाहरणे, खेळणी आणि कलांचा वापर करून त्यांनी कठीण गणिती संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजावून दिल्या. त्यांनी विकसित केलेले गणितीय शैक्षणिक साहित्य राज्यासह देशपातळीवर वापरले जात आहे.

शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी श्री. शिवप्रसाद टिंगरे यांनी प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित विज्ञान शिक्षण, कमी खर्चातील प्रयोगसाधने आणि परस्परसंवादी डिजिटल अध्यापनाचा प्रभावी वापर केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक नवोपक्रम पुरस्कार तसेच जपानमधील आंतरराष्ट्रीय विज्ञान उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

उच्च शिक्षण क्षेत्र-डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या भूविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे संगणकीय आणि प्रायोगिक भूयांत्रिकी संशोधन गटाचे नेतृत्व करतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कार्बन पकड व साठवणूक तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणालींवर त्यांनी उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्राला महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे.

डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा

बालरोग विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. अमर ताकसांडे यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यासोबतच ग्रामीण भागातील बालकांना सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे.

डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर

इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार क्षेत्रातील प्रतिमा प्रक्रिया आणि जैवमिती या विषयांमध्ये डॉ. संदीपान नरोटे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. तंत्रनिकेतनातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि बदलत्या औद्योगिक गरजांनुसार त्यांची क्षमता विकसित व्हावी यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.

कौशल्य विकास व उद्योजकता क्षेत्र-किरण प्रकाश झारकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव

पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत श्री. किरण झारकर यांनी धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रभावी शिक्षण परिसंस्था विकसित केली. डिजिटल माध्यमे, संगणकाधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासह रोजगारक्षमतेलाही मोठी चालना मिळाली आहे.

अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

आदिवासी आणि दुर्गम भागातील युवतींना कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी श्रीमती अर्चना जाधव यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. वस्त्र व फॅशन रचना तंत्रज्ञान विभागात प्रशिक्षण देताना त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी युवतींना आधुनिक वस्त्ररचना, शिवणकाम आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्यांचे दर्जेदार प्रशिक्षण दिले. या माध्यमातून अनेक युवतींना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान appeared first on Berar Times.

१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान
पुढील वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार आणि आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराची घोषणा

पुणे दि. ५: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. सांस्कृतिक पैलू  व तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ, पद्मभूषण डॉ. जे.पी.नाईक यांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास, आरोग्य क्षेत्रातील मुलभूत योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शिक्षक पुरस्कार सुरू करावेत, अशी मागणी नाईक साहेबांच्या कार्याचे अभ्यासक असलेले, आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी केली होती, ती मान्य करून हे पुरस्कार सुरू करताना मला विलक्षण आनंद होत आहे, कृतार्थ वाटत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार १४ वर्षांच्या परंपरेनंतर पुन्हा सुरु झाला. पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयाचे पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.

“मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. पुढील पिढीत चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे,” असे मंत्री पाटील यांनी नमूद केले.

शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करतात. आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट बदलत्या काळानुसार शिक्षकांवर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे मत यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ डीजेपुरता मर्यादित न राहता त्यातील सांस्कृतिक व धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

तरुण पिढीमध्ये भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री पाटील यांनी एकल पालक कुटुंबांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकल पालक योजनेसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. कोथरूड परिसरातील सुमारे ९५० एकल महिलांना समुत्कर्ष ग्राहक पेठेतून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी एकल माता कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता असून, अशा कुटुंबांना व्यापक स्तरावर मदत मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वाचा सहभाग असल्याने त्यांनाही आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

प्रस्ताविकात डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मंत्री पाटील यांच्यामुळे २०१२ मध्ये खंडित झालेली शिक्षक पुरस्काराची परंपरा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली याचा आनंद व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत राज्यातील ४२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, गुणात्मक शिक्षण, शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे.

पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना अनेक पातळ्यांवर छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय समितीत मान्यवर शिक्षकांचा समावेश होता. कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेतून ४२ नावांची निवड करण्यात आल्याचे देवळाणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पुरस्कारामुळे केवळ शिक्षकांचा नव्हे, तर त्यांच्या परिवाराचाही सन्मान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याची भावना डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली. पुरस्काराप्राप्त डॉ. देविदास वायदंडे, अंजली जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कृतज्ञता व्यक्त केली.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्जनशील आणि संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान होत असल्याची भावना पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांनी व्यक्त केली. तसेच, शिक्षक हे सामाजिक नेतृत्व करणारे घटक असून पुरस्कार त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याबरोबरच सामाजिक जाणीवही निर्माण करतात, अशी भावना पुरस्कार प्राप्त अंजली जोशी यांनी व्यक्त केली.

The post १४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान appeared first on Berar Times.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा –उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे, दि. ५: शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच भूमीत शिक्षणाची ज्योत पेटवली. या समृद्ध शैक्षणिक परंपरेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खरे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे कार्य ते करतात.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद असून त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, राज्य शासनाने शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाला नेहमीच अग्रक्रम दिला आहे. बदलत्या काळानुरूप शिक्षकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबतच समस्या निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणाची जोड देत त्यांच्यामध्ये सद्गुणांची रुजवणूक करावी. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाणारी सशक्त पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये, असा सल्लाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिला.

केंद्रप्रमुख हे शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. केंद्रप्रमुखांच्या यशस्वी नेतृत्वामुळे अनेक शाळांनी प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्व. अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडविण्याचा शासनाचा निर्धार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर, समूह शाळा, आदर्श शाळा, दत्तक शाळा, प्रवेशोत्सव, आरोग्य तपासणी, सैनिकी शिक्षण, मोफत गणवेश, निपुण महाराष्ट्र अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शाळांमधील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, ही जिल्हा परिषदेची भूमिका आहे. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. चांगल्या कामाचे नेहमीच मूल्यमापन केले जाईल. शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४३६ शिक्षक नव्याने रुजू होणार आहेत. शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याबाबतही राज्य शासन लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळांना संरक्षक भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य गुणवत्ता यादीतील ५० टक्के विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन ३००, ग्लोबल गुरुजी, शिक्षक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण, बालकुमार साहित्य संमेलन, मुलींसाठी सायकल बँक, बालसंसद आदी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील तीन विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती जितेंद्र बडेकर, अमोल नलावडे, अंकिता पाटील, दीपाली हुलावळे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा –उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार appeared first on Berar Times.

ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच !
‘आरपीआय’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांची भूमिका

पुणे:-सार्वजनिक उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिममुळे नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि जीवघेणे दुष्परिणाम होतात. हे धोके लक्षात घेता राज्यभरातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे-डॉल्बीच्या वापरावर कायमस्वरूपी कडक बंदी घालण्याच्या मागणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी समर्थन केले आहे.

डीजे सिस्टिम सुरू होताच ध्वनीची तीव्रता १०० ते १३० डेसिबेलच्या वर जाते, जी कायदेशीर मर्यादा ५५ ते ७५ डेसिबेलपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार सलग काही वर्षे उत्सव काळात शहरातील ९० टक्क्यांहून अधिक भाग उच्च ध्वनि प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात. या तीव्र आवाजाच्या कंपनांमुळे आणि लेझर लाईट्समुळे दरवर्षी नागरिक आणि बालकांना कायमचे बहिरेपण, दृष्टीदोष व मानसिक अपंगत्व येते; ही बाब गंभीर असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

डीजेच्या अत्यंत उच्च आवाजामुळे कार्डियाक अरेस्ट येऊन नागरिकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगली येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत ३२ वर्षीय शेखर पावशे व ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडे या युवकांचा डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच तीव्र आवाजामुळे कानाचे पडदे फाटणे, उच्च रक्तदाबाने गंभीर आजारी पडणे अशा शेकडो वैद्यकीय आपत्कालीन घटना दरवर्षी नोंदवल्या जातात, असे डॉ.चलवादी यांनी नमूद केले.

डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. सार्वजनिक उत्सवांचा उद्देश समाजात एकोपा, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी वाढवणे हा आहे. त्यामुळे उत्सव मंडळांनी डीजे-डॉल्बीला प्राधान्य न देता आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपणाऱ्या ढोल-ताशांसह लेझीम, हलगी, तुतारी आणि इतर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा सांस्कृतिक बाज अधिक प्रभावीपणे जपला जाऊ शकतो आणि पुढील पिढीलाही आपल्या लोकपरंपरांची ओळख करून देता येईल. आधुनिकतेच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण वाढवण्यापेक्षा संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव साजरा करणे हीच काळाची गरज असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

The post ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच ! appeared first on Berar Times.

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार
नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद

नवी दिल्ली, दि. 3 : नवी दिल्ली येथील ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ या जागतिक परिषदेच्या ऊर्जा प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाइनच्या पुरस्काराने मंगळवारी(दि.1) गौरविण्यात आले. केंद्रीय विद्युत आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील यशोभूमिमध्ये येथे १ ते ३ सप्टेंबरपर्यंत आयोजित ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाले आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात राज्याने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण या परिषदेतील लक्षवेधक प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे व त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी., महाऊर्जाचे महासंचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनात चारही संस्थांचे संयुक्त प्रदर्शनी दालन या परिषदेत उभारण्यात आले आहे. महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक गडकिल्ल्यांची ओळख तसेच हरित ऊर्जेतील प्रवासाचा संगम साधून या दालनाची रचना करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे चित्र आणि तंत्रज्ञानावर आधारित हरित ऊर्जेच्या भविष्याकडे होणारा प्रवास दालनातून दाखविण्यात येत आहे.

ऊर्जा विभागाच्या या दालनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘इंटरअॅक्टिव्ह टच वॉल’ला मोठा प्रतिसाद मिळाला. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या प्रमुख योजना, प्रकल्प आणि यशाची माहिती या डिजिटल माध्यमातून देण्यात आली. तसेच ‘इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन’वर ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाच्या माध्यमातून या चारही संस्थांचे यश आणि विविध उपक्रम डिजिटल स्वरूपात दाखवण्यात आले. यासह ‘इमर्सिव्ह व्हर्च्युअल रिअॅलिटी झोन’मधून घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषिपंप आणि सिन्नर सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये व्हर्च्युअली फेरफटका मारता आला. या दालनात ‘सेल्फी बूथ’ देखील आकर्षण ठरले आहे. इंटरअॅक्टिव्ह तंत्रज्ञान, व्हर्च्युअल अनुभव, डिजिटल माहिती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित रचना यामुळे हे दालन माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण ठरले आणि परिषदेतील सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईनच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

The post महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार appeared first on Berar Times.

महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महसूल, वन आणि जमाबंदी विभागाचा एकिकृत डॅशबोर्ड

मुंबई, दि. २ – महाराष्ट्र लँडबँक डिजीटल प्रणालीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाला गतिमानता येईल तसेच पर्यायी वनीकरणासाठी जमिनीची उपलब्धता निश्चित करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीच्या जमिनींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र लँड बँक डिजीटल प्रणाली – डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. या प्रणालीचा काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शुभारंभ करण्यात आला. या डॅशबोर्डबाबत महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि जमाबंदी आयुक्त शैलेश नवल यांनी सादरीकरण केले.

महाराष्ट्र लँड बँकेमुळे शासकीय जमिनीची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन जमीन शोध, पडताळणी व वाटप प्रक्रियेत सुलभता येईल. उपलब्ध जमिनीचा योग्य वापर, विभागांच्या गरजेनुसार जमिनीचे जलद मॅपिंग, निर्णयप्रक्रियेतील विलंब कमी करणे आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविण्यास प्रणाली सहाय्यभूत ठरते. तसेच विभाग, जिल्हा, तालुका व गावनिहाय माहिती संकलन व प्रगती अहवालाद्वारे कामकाजाचा आढावा घेता येणार आहे.

महाराष्ट्र लँड बँक शासकीय जमिनीच्या डेटा-आधारित व्यवस्थापनासाठी एकात्मिक डिजिटल व्यवस्था असून, अभिलेख, प्रत्यक्ष स्थळपाहणी, GIS विश्लेषण आणि MIS यांचा समन्वय साधून शासकीय जमीन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

सध्या शासकीय जमिनीची माहिती विविध स्तरांवर विखुरलेली असल्याने उपलब्ध जमीन, तिची सद्यस्थिती, क्षेत्रफळ, वापराची स्थिती तसेच वाटप शर्तभंग याबाबतची माहिती वेळेत उपलब्ध होण्यास अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर शासकीय जमिनीची सद्यस्थिती व अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लँड बँक एकात्मिक डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

लँडबँक प्रणालीची कार्यपद्धती –

अभिलेख पडताळणी – ई-फेरफार व उपलब्ध अभिलेखांच्या आधारे भूमापन क्रमांक, क्षेत्रफळ व जमीन वर्गाची प्राथमिक माहिती तपासली जाणार.

स्थळ पाहणी व सत्यापन – प्रत्यक्ष स्थळ पाहणीद्वारे जमिनीची सद्यस्थिती, शिल्लक क्षेत्र व शर्तभंगाची माहिती निश्चित केली जाते.

एकात्मिक माहिती संकलन – विविध स्रोतांमधील माहिती एकत्रित करून सुरक्षित डिजिटल रिपॉझिटरीमध्ये उपलब्ध केली जाते.

तालुका स्तरावरील प्रवेश – तहसीलदारांना प्रणालीमध्ये लॉगीन उपलब्ध असून, सरकारी जमीन तसेच भोगवटदार वर्ग-२ जमिनींच्या वाटपाची स्थिती व शर्तभंगासंबंधी माहिती नोंदविता येते.

GIS आधारित विश्लेषण – नकाशा व स्थानाचारित माहितीच्या माध्यमातून उपलब्ध जमीन आणि प्रलंबित प्रकरणांचे भौगोलिक विश्लेषण करता येते.

डिजिटल जमीन मागणी प्रक्रिया : विभागांकडून ऑनलाइन मागणी, नोंदणी, छाननी, पडताळणी व मंजुरीची प्रक्रिया राबविता येते. GPS लोकेशन, दिनांक व वेळेसह स्थळपाहणीची माहिती नोंदविण्याची सुविधाही प्रणालीमध्ये आहे.

The post महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Berar Times.

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी नवी मुंबईत निदर्शने; तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्या नियुक्तीची मागणी
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने वातावरण तापले

पुण्यातून मोठा लढा उभारण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याचा आयोगाचा दावा पोलीस तपासात फोल ठरला आहे. या प्रकरणात एमपीएससी मधीलच तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने या महत्त्वाच्या संस्थेच्या पारदर्शकतेवर आणि प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नवी मुंबईतील MPSC कार्यालयाबाहेर तीव्र प्रातिनिधीक आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात “MPSC अध्यक्ष Go Back” आणि “अध्यक्ष हटाओ, MPSC बचाओ” अशा घोषणांचे फलक घेऊन जोरदार निदर्शने केली.

अध्यक्षांवर गंभीर आरोप; पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह

आरटीओ (RTO) कमिशनर असताना विवेक भीमनवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकारांचे आरोप झाले होते. असे गंभीर आरोप असतानाही केवळ राजकीय संबंधांमुळे शासनाने त्यांची या घटनात्मक पदावर नियुक्ती केली, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. ज्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आणि गैरप्रकारांचे गंभीर आरोप आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससीचा कारभार पारदर्शक कसा राहू शकतो? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची मागणी

विवेक भीमनवार यांना तातडीने पदावरून हटवून त्यांच्या जागी तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्यासारख्या कडक आणि स्वच्छ प्रतिमेच्या आयएएस अधिकाऱ्यांची MPSC च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या या प्रकाराविरोधात राज्यातील परीक्षार्थी आणि विद्यार्थी आता एकवटले असून, या मागणीसाठी लवकरच पुण्यातून मोठा आणि तीव्र लढा उभारला जाणार आहे. नवी मुंबईतील या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या या आगामी लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

The post MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी नवी मुंबईत निदर्शने; तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्या नियुक्तीची मागणी appeared first on Berar Times.

शासकीय, निमशासकीय बैठक, कार्यक्रम, उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ, संतुलित मेनू बंधनकारक
मुंबई,दि.०१ः-शासकीय, निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व उपहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा आणि तशाच पद्धतीचा मेनू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठका, कार्यक्रम आणि प्रशिक्षणाच्या वेळी संतुलित व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषक आहाराची सवय ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, या उद्देशाने सर्व विभागांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षण संस्था, परिषदा तसेच उपहारगृहांमध्ये अल्पोपहार अथवा भोजन देताना आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये हंगामी फळे, केळी, सफरचंद, पेरू, पपई यांसारखी फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, मागणीनुसार गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी, नाचणीची भाकरी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी व उसळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अल्पोपहारामध्ये तेलकट व अति-प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच पौष्टिक घटक असलेल्या स्थानिक व पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जेवणामध्ये डाळ, उसळ, पालेभाज्या, ताक, कोशिंबीर, भाजी आणि आवश्यकतेनुसार संतुलित धान्यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.

संबंधित कार्यालयांच्या नवीन खानपान (केटरिंग) करारामध्ये आरोग्यदायी मेनूचा समावेश करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित शासकीय तसेच निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी आरोग्यविषयक भूमिकेबाबत चर्चा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

शासकीय व निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराबाबत आवश्यक जनजागृती करावी तसेच संतुलित आहाराचे मेनू उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. आरोग्यदायी मेनू निश्चित करताना ICMR-NIN यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग करता येणार आहे.

मंत्रालयातील उपहारगृहात सध्या फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पोपहारातील तेलकट खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली असून, डाळ, उसळ, पालेभाजी, ताक, कोशिंबीर, पुलाव यांसारख्या पौष्टिक पदार्थांचाही जेवणात समावेश करण्यात येत आहे.

The post शासकीय, निमशासकीय बैठक, कार्यक्रम, उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ, संतुलित मेनू बंधनकारक appeared first on Berar Times.

शाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावे- प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
पुणे-शाश्वत विकास उद्दिष्टे सन २०३० पर्यंत साध्य करण्यासाठी विकासकामांचा वेग वाढवून नियोजनबद्ध, समन्वयाने आणि परिणामाधारित पद्धतीने काम करण्याची गरज आहे. यासाठी विविध शासकीय विभागांनी अभिसरणातून एकत्रित प्रयत्न करून उपलब्ध निधीचा प्रभावी आणि परिणामकारक वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले.

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. परदेशी बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

राज्याचा एसडीजी इंडेक्स स्कोअर ७३ टक्के असून, शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करीत आहे. आरोग्य, ऊर्जा आणि शाश्वत नागरी विकास या क्षेत्रांत राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘उत्तम आरोग्य व सुदृढता’, ‘परवडणारी व स्वच्छ ऊर्जा’ तसेच ‘शाश्वत शहरे व समुदाय’ या उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. आगामी काळात या चांगल्या कामगिरीला आणखी गती देतानाच इतर उद्दिष्टांमध्येही वेगाने प्रगती साधून सन २०३० पर्यंतची शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि परिणामाधारित पद्धतीने काम करावे, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

कुपोषण, रक्तक्षय निर्मूलनाला प्राधान्य

‘शून्य भूक’ या उद्दिष्टातील कामगिरी सुधारण्यासाठी कुपोषण आणि रक्तक्षयाच्या समस्येकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. इतर राज्यांनी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सुधारणांचा अभ्यास करून त्यातील प्रभावी पद्धती राज्यात राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी विभागीय पातळीवर समन्वयाने आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विमा कव्हरेज वाढविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, कार्ड वितरण, अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश तसेच योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहितीचे रिअल टाइम संकलन करणारी सक्षम व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) विकसित करणे, योजनेची फलश्रुती मोजणे, माहिती विश्लेषणाच्या आधारे कामगिरीत सुधारणा करणे, निधीचा काळजीपूर्वक आणि परिणामकारक वापर करणे, खर्चाचे नियमित मूल्यांकन करून त्याची एसडीजी निर्देशकांशी सांगड घालणे आदी बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना डॉ.परदेशी यांनी केल्या.

नियोजन विभागाने एसडीजीच्या ‘ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ आणि ‘ॲस्पिरेशनल ब्लॉक’ उपक्रमाशी समन्वय साधून राज्यातील १० जिल्हे आणि १७७ तालुक्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश दिले आहेत. एखाद्या योजनेमुळे किंवा उपक्रमामुळे पूर्वीच्या तुलनेत प्रत्यक्ष किती बदल झाला, याचे ‘डेल्टा’ मोजून त्याआधारे पुढील नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील चार वर्षांत योजना, निधी, अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष परिणाम यांची सांगड घालून विकासाचा वेग वाढवावा, असे आवाहन डॉ.परदेशी यांनी केले.

ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविकात विविध विभागांच्या योजनांमध्ये अभिसरण व समन्वय साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली. केवळ योजना व उपक्रम राबविणे पुरेसे नसून त्यातून नागरिकांच्या जीवनमानात प्रत्यक्ष किती सुधारणा झाली, याचे परिणामाधारित मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत राज्यातील एसडीजीच्या प्रगतीचा आढावा, विविध निर्देशांकांमध्ये महाराष्ट्राची स्थिती, विभागनिहाय कामगिरी तसेच पुढील चार वर्षांत साध्य करावयाच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर मंथन करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

The post शाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावे- प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी appeared first on Berar Times.

भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे-भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. या समाजातील कोणत्याही बालकाचे शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

फर्ग्युसन महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने आयोजित ‘भटके-विमुक्त दिवस’ राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, संचालक सोनाली मुळे आदी उपस्थित होते.

‘भटके-विमुक्त दिवस’ अन्यायातून मुक्ती, आत्मसन्मान, अधिकार, शिक्षण, सक्षमीकरण आणि सामाजिक प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे नमूद करीत राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, शिक्षण ही या समाजाच्या विकासाची सर्वात मोठी शक्ती असून, त्यासोबत कौशल्य विकास आणि पुनर्कौशल्य विकासावरही भर देणे आवश्यक आहे. पालकांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी कुटुंबे ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वसतिगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण, उच्च व व्यावसायिक शिक्षण तसेच संशोधनाच्या संधी वाढविण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

भटके-विमुक्त समाजातील मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्याची गरज असून, एक शिक्षित मुलगी संपूर्ण कुटुंबाचे आणि पुढील पिढ्यांचे भविष्य बदलू शकते, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधींशी जोडण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’सारख्या उपक्रमांचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

भटके-विमुक्त आणि घुमंतू समाजाचे शेती, शिल्पकला, पशुपालन, वाहतूक, लोककला क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करून श्री.वर्मा म्हणाले, भटके-विमुक्त समाजाचा संघर्ष हा केवळ इतिहासाचा विषय नसून सामाजिक न्यायाचा विषय आहे. स्थिर निवास, जमिनीचा अधिकार, नागरिकत्वाची कागदपत्रे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी शासन आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांच्या आयोजनाची सूचना त्यांनी केली.

पारंपरिक कौशल्यांना आधुनिक बाजारपेठेशी जोडून भटके-विमुक्त समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. हस्तकला, लोककला, पशुपालन, छोटे व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविकेच्या साधनांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेची जोड देऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात. युवकांना कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – अतुल सावे

भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, शासकीय प्रमाणपत्रे, रोजगार, स्वयंरोजगार आणि पायाभूत सुविधांवर शासनाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने मिळावीत सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ९ लाख २७ हजार ९७३ शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, यापुढे वस्तीस्तरावर शिबिरे घेऊन ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येणार असल्याचे सावे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती तसेच शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जात आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येत असून, या योजनांसाठी आतापर्यंत सुमारे ४ हजार २३६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी २०२१-२२ पासून इंग्रजी माध्यमाच्या निवासी शिक्षणाची सुविधा सुरू असून, आतापर्यंत सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे. तसेच ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता यावे यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती आदी परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळत असल्याचे सावे यांनी नमूद केले.

भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वस्ती सुधार योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिक कला, संस्कृती आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘बंजारा हट’ उभारण्यात आले आहे. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, भटके-विमुक्त समाजातील महिलांना शिक्षणाचा अभाव, बालविवाह आणि सामाजिक विषमतेला सामोरे जावे लागते. वैदू समाजातील महिलांना वस्तू विक्रीसाठी जाताना चोरीच्या संशयातून अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे महिला व बालकांच्या संरक्षणासह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न व निधीची गरज आहे. समाजाने आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जपत शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी शासनाकडून विविध सकारात्मक उपक्रम राबविले जात असून, त्याला अधिक गती देण्यासाठी स्वतंत्र धोरण, शिक्षण आणि घरकुलाच्या सुविधा आवश्यक आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू राहावेत, असे भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांनी सांगितले.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांनी प्रास्ताविकात भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, मूलभूत कागदपत्रे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते भटके-विमुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज बांधवांना प्रतिनिधिक स्वरूपात जातीच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध पुस्तिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला भटके-विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.

The post भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर भर द्यावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा appeared first on Berar Times.