यशोगाथा Archives - Berar Times

सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका: उमेद योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना
गोंदिया, दि. 11: आमगाव तालुक्यातील केलसर येथे “समृद्ध CLF गट” मार्फत सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना व शेतकऱ्यांना रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध झाले आहे. “सूक्ष्म प्रकल्प सन 2024-25” अंतर्गत सुमारे 45 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या प्रकल्पाची दररोज 2 टन उत्पादनाची क्षमता असून, एकूण 180 सदस्य या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. रोपवाटिकेसाठी 4.5 एकर तर भाजीपाल्यासाठी तब्बल 45 एकर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनावर भर देण्यात आल्याने बाजारात या उत्पादनांना चांगली मागणी मिळत आहे.

या प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती झाली असून, सुमारे 500 कुटुंबांना या उपक्रमातून उपजीविकेचा आधार मिळाला आहे. महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रकल्पामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळाली आहे.सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आरोग्यदायी अन्ननिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीचा मार्ग या प्रकल्पातून पुढे येत आहे. भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

The post सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका: उमेद योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना appeared first on Berar Times.

दूध संकलन व शीतकरण केंद्र : उमेद योजनेचा यशस्वी नमुना
गोंदिया, दि.9 : ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाला चालना देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने “दूध संकलन व शीतकरण केंद्र” हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात,  एकता दूध शीतकरण केंद्र, चिलाटी – निसर्ग CLF, सोनी, येथे स्थापन करण्यात आलेले हे केंद्र उमेद (MSRLM) अंतर्गत सक्षमीकरण प्रकल्प सन 2024-25 मध्ये राबविण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 71.28 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, दररोज 5,000 लिटर दूध शीतकरणाची क्षमता या केंद्रात उपलब्ध आहे. परिसरातील 8 दूध संकलन केंद्रांमार्फत दूध गोळा करून येथे शीतकरण केले जाते. या उपक्रमाचा थेट लाभ सुमारे 2000 कुटुंबांना होत असून, सुमारे 42 किलोमीटरच्या परिसरातील गावांचा समावेश आहे. सध्या दररोज 600 ते 700 लिटर दूध संकलित होत असते.

या केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. दूध योग्य तापमानात साठविल्याने त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि बाजारभाव चांगला मिळतो. परिणामी, पशुपालकांना अंदाजे 2 ते 3 रुपये प्रति लिटर अतिरिक्त दर मिळत असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे.

दूध संकलन व शीतकरण केंद्रामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळाली असून महिलांच्या स्वयं-सहायता गटांनाही बळकटी मिळत आहे. एकात्मिक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी ठरला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आदर्श उपक्रम म्हणून तो पुढे येत आहे.

The post दूध संकलन व शीतकरण केंद्र : उमेद योजनेचा यशस्वी नमुना appeared first on Berar Times.

यशोगाथा: भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’
अवघ्या ​४५ कलमांपासून ६ हजार झाडांपर्यंतचा प्रवास; आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीची सांगड

“शेती तोट्याची आहे”, “यात काही उरले नाही”, असा सूर आळवणाऱ्यांसाठी चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास डोळे उघडणारा आहे. केवळ ४५ हापूसच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार कलमांच्या विशाल साम्राज्यात बदलला आहे. त्यांच्या याच अथांग मेहनतीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना मानाचा १ लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे स्वरुप असणारा ‘उद्यानपंडित’ पुरस्कार दिला आहे. ‘आंबेवाले केतकर’ म्हणून प्रसिद्ध असणारे धनंजय केतकर आता ‘उद्यानपंडित’ ठरले आहेत.

​सन १९७३ मध्ये धनंजय केतकर यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी केवळ ४५ कलमांच्या आधारावर या आंब्याच्या बागेची मुहूर्तमेढ रोवली होती. पुढच्या पिढीने हा वारसा तितक्याच निष्ठेने पुढे चालवला. चुलते, मोठे बंधू आणि संपूर्ण कुटुंबाच्या अखंड परिश्रमांतून आज भिले येथील बागेत तब्बल ६ हजार आंब्याची कलमे डोलत आहेत. यातील साडेतीन हजार कलमे सध्या व्यावसायिक उत्पादन देत आहेत. याशिवाय बागेत दीड हजार काजूची झाडे आणि १० ते १२ एकरावर भात व कडधान्याची पिकेही घेतली जातात.

​सेंद्रिय शेतीचा मंत्र आणि ‘नो दलाल’ पॉलिसी

​केतकर यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा दिला आहे. गांडूळ खत, शेणखत, जिवामृत आणि गोकृपामृत यांच्या जोरावर संपूर्ण शेती फुलवली जाते. व्यावसायिक दूध विक्रीसाठी नव्हे, तर घरच्या दुधासाठी आणि शेतीला सेंद्रिय खत मिळण्यासाठी त्यांनी देशी गाई व म्हशींचे पालन केले आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा दर्जेदार आंबा कोणत्याही दलालाला न विकता थेट ग्राहकांना विकला जातो. यामुळेच ग्राहकांचा विश्वास आणि केतकरांचा नफा दोन्ही सुरक्षित राहते.

श्री. ​केतकर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी गवत कापणी यंत्र, पॉवर स्प्रे, ट्रॅक्टर आणि गांडूळ खत प्रकल्प उभारले आहेत. शिवाय १०० टक्के फलोत्पादनखाली लाभ घेतला आहे. आज त्यांच्या या १२० एकर क्षेत्रावरील शेतीचा डोलारा सांभाळण्यासाठी स्थानिक आणि नेपाळी मिळून सुमारे ७० कामगारांचा ताफा अहोरात्र राबत आहे.

​”शेतकऱ्यासारखा दुसरा राजा नाही…”

“गावागावांत मोफत धान्य मिळत असल्याने काहींमध्ये आळशीपणा आला आहे, शेती कशाला हवी अशी मानसिकता तयार होत आहे. पण, शेती हा आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी समृद्ध झाला तरच गाव, तालुका, जिल्हा पर्यायाने राज्य आणि देश समृद्ध होईल. प्रामाणिक प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती आजही उत्तम आहे आणि उद्याही उत्तमच असणार आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यासारखा दुसरा कोणीही राजा नाही!”

— धनंजय केतकर (उद्यानपंडित)

निसर्गातील बदलांचे आव्हान झेलत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री केतकर यांनी घेतलेली ही झेप कोकणातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. ‘आंबेवाले केतकर’ ते ‘उद्यानपंडित’ हा प्रवास कृषी क्षेत्रातील एका नव्या क्रांतीची साक्ष देणारा आहे.​प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते,जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

The post यशोगाथा: भिल्याचे ‘आंबेवाले केतकर’ आता ‘उद्यानपंडित’ appeared first on Berar Times.

कारंजा तालुक्यात शेतरस्त्यांची क्रांती,महिनाभराच्या विशेष मोहिमेत ४४ रस्ते खुले
शेतकऱ्यांतील वाद मिटवत प्रशासनाने मोकळी केली वहिवाट

वाशिम ,दि.२३ जुन : अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वादामुळे अडथळ्यांत अडकलेले शेतपांदन रस्ते आता पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत आले आहेत. कारंजा तहसील प्रशासनाने राबविलेल्या महिनाभराच्या विशेष मोहिमेत एकूण ४४ शेतपांदन रस्ते अडथळामुक्त करून वहिवाटीस उपलब्ध करून देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन तक्रारींचा निपटारा, आपसी सामंजस्यातून वाद मिटविणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर प्रक्रिया राबविणे अशा बहुआयामी प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील शेतरस्ते अडथळामुक्त करण्याच्या उपक्रमाला कारंजा तालुक्यात प्रभावी स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, तंटामुक्ती समित्या, पोलीस पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केले. अनेक ठिकाणी प्रशासनाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत वास्तविक परिस्थिती समजावून सांगितली. परिणामी, न्यायालयीन वाद किंवा संघर्ष न वाढविता परस्पर सहमतीने अनेक प्रश्न मार्गी लागले.विशेष म्हणजे, ३४ शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे व अडथळे दूर करून ते शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले, तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अंतर्गत १० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. आणखी २६ प्रकरणे चालू महिन्याच्या अखेरीस निकाली निघण्याची अपेक्षा आहे.

यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेअंतर्गत मंजूर १७ रस्त्यांची मोजणी पूर्ण करण्यात आली असून त्यावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतूक, कृषी यंत्रसामग्रीची ने-आण आणि शेतीची दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत.

मोहिमेचा आणखी एक सकारात्मक पैलू म्हणजे सहकार्याची भावना. स्वखुशीने रस्ते मोकळे करून देणाऱ्या शेतकऱ्यांचा तहसील प्रशासनाने सन्मान केला. त्यामुळे गावोगावी सामंजस्य, संवाद आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

या मोहिमेसाठी तहसीलदारांसह नायब तहसीलदार विनोद हरणे, परिविक्षाधीन तहसीलदार तृप्ती खैरनार, मंडळ अधिकारी लोखंडे, मनवर, खाडे, कटके, धानोरकर, कांबळे, गुगळे, पवार तसेच ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.दरम्यान, शेतपांदन रस्ते अडथळामुक्त करण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असून शेतकरी बांधवांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

The post कारंजा तालुक्यात शेतरस्त्यांची क्रांती,महिनाभराच्या विशेष मोहिमेत ४४ रस्ते खुले appeared first on Berar Times.

नवेगावबांध जलाशयातून गाळ उपसा सुरू;​१.२५ कोटी लिटर पाणीसाठा क्षमता उपल्बध होणार
लोकसहभागातून जलसाठा वाढविण्याचा संकल्प

अर्जुनी-मोर. -तालुक्यातील नवेगावबांध येथील ऐतिहासिक जलाशयाची सिंचन क्षमता आणि जलसाठा वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी योजनेला खऱ्या अर्थाने सार्थक ठरवत, यंदाही जलाशयातील गाळ स्वखर्चाने काढून वाहून नेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांनी नियमानुसार या खोलीकरणाला आणि माती वाहून नेण्यास अधिकृत परवानगी प्रदान केली आहे.​जनतेच्या या ऊर्जेमुळे नवेगावबांध परिसरात जलसंधारणाची एक नवी चळवळ उभी राहिली असून, भविष्यातही अशाच प्रकारे लोकसहभागातून आदर्श प्रकल्प राबविले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

​स्थानिक नागरिकांच्या अभूतपूर्व पुढाकारातून आणि उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जलाशयातून तब्बल ५ हजार ट्रॅक्टर ट्रॉली गाळाचा यशस्वी उपसा करण्यात आला होता. कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता, सुमारे १२ हजार ५०० घनमीटर गाळ उपसल्यामुळे जलाशयात १ कोटी २५ लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला होता. याच यशस्वी उपक्रमाचा संदर्भ घेत यंदाही कामाला गती देण्यात आली आहे.

​स्थानिक ट्रॅक्टर व जेसीबी मालकांचा पुढाकार

​सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलाशयाची पाणीपातळी खालावली असताना, जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर नवेगावबांध येथील जेसीबी आणि ट्रॅक्टर मालकांनी स्वतःहून आर्थिक भागीदारी करत कामाला सुरुवात केली आहे. स्वखर्चाने तलावातील गाळ व माती उपसून ती वाहून नेली जात आहे. यामुळे तलावाचे नैसर्गिक खोलीकरण होण्यास मदत होत आहे.

​शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीला मोठा फायदा

​या खोलीकरणामुळे आगामी पावसाळ्यात नवेगावबांध जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त जलसाठा निर्माण होणार आहे.तलावात अधिक काळ पाणी साचून राहिल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढेल.वाढलेल्या पाण्याच्या साठ्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात सिंचनासाठी मोठी मदत होईल.नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होऊन परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळेल.

​”नवेगावबांध परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी स्वतःहून पुढे येत जलसाठा वाढविण्यासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत प्रेरणादायी आहे. शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला जनतेच्या सहभागामुळे मोठे बळ मिळत असून, या उपक्रमामुळे भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे.”

— समीर बनसोडे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग

The post नवेगावबांध जलाशयातून गाळ उपसा सुरू;​१.२५ कोटी लिटर पाणीसाठा क्षमता उपल्बध होणार appeared first on Berar Times.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे जाळे
पूर्व विदर्भातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत पाणी

वैनगंगा खोऱ्यात जलसमृद्धीकडे मोठे पाऊल

गडचिरोली, दि.16: पूर्व विदर्भातील जलसंकट दूर करून शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जलसंपदा विभागाने वैनगंगा नदीवर महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नदीवर पूर्ण झालेले, बांधकामाधीन आणि प्रस्तावित बॅरेजेसचे (बंधारे) जाळे उभारण्यात येत आहे. या संकल्पनेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये वैनगंगा नदीच्या जलसंपत्तीचा अधिक प्रभावी वापर करून पूर्व विदर्भातील जलसमृद्धीचा मार्ग खुला करण्यावर भर देण्याबाबत

जलसंपदा विभागाला सूचना दिल्या होत्या. नदीवर टप्प्याटप्प्याने बॅरेजेस उभारल्यास सिंचन क्षमता वाढेल, एकापेक्षा अधिक पिके घेणे शक्य होईल आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना मिळेल, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आता त्या संकल्पनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे.

चिचडोह बॅरेज; ११४.८२ दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन

या योजनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून चामोर्शी गावाजवळील चिचडोह बॅरेज पूर्ण होऊन कार्यान्वित झाला आहे. या बॅरेजमुळे वाघोली-बुटी आणि तळोधी मोकासा या उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण झाली असून वाघोली बुटी या योजनेचे लाभक्षेत्रास गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाद्वारे कालव्याद्वारे सिंचन होत आहे. त्यामुळे, चिचडोह बॅरेजच्या पाणीपसाऱ्यातून तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना कार्यरत असून प्रकल्पामुळे चामोर्शी परिसरातील १६ गावांमधील सुमारे ४३३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. चिचडोह बॅरेजच्या पाणी पसाऱ्यातून राजीव चिचडोह

योजनेला प्रशासकीय मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे दिना प्रकल्पाच्या पुच्छ भागातील १३ गावाच्या ४०१७ हेक्टर व १२३३ हेक्टर स्वतंत्र लाभक्षेत्रास सिंचनाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहे. चिचडोह बॅरेजची एकूण साठवण क्षमता ६२.३५ दशलक्ष घनमीटर असून सिंचन (८१.३५), पिण्याचे पाणी (९.३८), औद्योगिक वापर (६.२५) आणि बाष्पीभवनाचा(१७.८४) विचार करून एकूण ११४.८२ दशलक्ष घनमीटर पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे.

कोटगल बॅरेजचे काम वेगाने सुरू

गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेजचे काम सध्या प्रगतीपथावर असून या प्रकल्पाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या बॅरेजच्या माध्यमातून पोर्ला-वसा, कोटगल आणि गोगाव या तीन उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी कोटगल आणि गोगाव योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४१ गावांमधील सुमारे १० हजार १९९ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

कळमगाव बॅरेजचे पुनर्मूल्यांकन

चामोर्शी तालुक्यातील कळमगाव बॅरेजच्या लाभक्षेत्रातील बहुतांश योजना गोसीखुर्द प्रकल्पात समाविष्ट झाल्या आहेत.तर उर्वरित योजना चिचडोह बॅरेजमधून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या या प्रकल्पाच्या लाभक्षेत्राचे पुनर्मूल्यांकन सुरू असून भविष्यात पिण्याच्या पाणीपुरवठा अथवा औद्योगिक गरजांच्या अनुषंगाने त्याचा पुनर्विचार करण्यात येणार आहे.

ऐनबोथला आणि डोंगरसावंगी बॅरेजेसच्या अभ्यासाला गती

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित ऐनबोथला बॅरेजमुळे बोरगाव, नांदगाव, भननारहेटी आणि रामपूर-चंदनखेडी या चार उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे ६९ गावांमधील तब्बल २४ हजार २६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. तसेच, सदर प्रकल्पातून गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक पाणी मागणी गरज काहीश्या प्रमाणात भागवली जाणे शक्य आहे. हुमन नदी प्रकल्पापासून स्वतंत्र ठेवून या प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास सध्या सुरू आहे. तसेच, आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी बॅरेजच्या माध्यमातून डोंगरगाव-ठाणेगाव आणि देऊळगाव-डोंगरसावंगी योजनांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे १७ गावांमधील ४ हजार ५४१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या वैनगंगा नदीच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. चिचडोह बॅरेज कार्यान्वित झाल्यानंतर कोटगल, ऐनबोथला आणि डोंगरसावंगी हे प्रकल्पही पूर्णत्वास गेल्यास गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील मिळून सुमारे ५३ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे जवळपास १९८ गावांतील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होईल. सिंचनासोबतच पिण्याचे पाणी, औद्योगिक विकास आणि भूजल

पुनर्भरणालाही चालना मिळणार असून पूर्व विदर्भाच्या कृषी अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

नुकतेच जलसंपदा विभागाच्या बैठकीत ऐनबोथला आणि डोंगरसावंगी या प्रस्तावित बॅरेजेसचे सुधारित आराखडे आणि पिकपाणी गरजेच्या अभ्यासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आकार घेत असलेल्या या जलसमृद्धी उपक्रमामुळे वैनगंगा खोऱ्यातील विकासाला नवी दिशा मिळणार असून पूर्व विदर्भाच्या परिवर्तनात हे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून वैनगंगा नदीवर बॅरेजेसचे जाळे appeared first on Berar Times.

गोट फार्म हेच जीवनाचे ध्येय;आमगावच्या तरुणाची रोजगारनिर्मितीची प्रेरणादायी यशोगाथा
आमगाव :नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार करून माली येथील सुशिक्षित तरुण राजेंद्र रामराज शेंडे यांनी शेळीपालन व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोटा जातीच्या शेळ्या व बोकडांच्या संगोपनातून त्यांनी आधुनिक गोट फार्म उभारला असून, आज त्यांना या व्यवसायातून दरवर्षी चांगला आर्थिक लाभ मिळत आहे.

राजेंद्र शेंडे यांनी बी.ए. तसेच आयटीआय (ऑटोमोबाईल) शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर येथे ऑटोमोबाईल क्षेत्रात काम केले. कोरोनाच्या काळात परिस्थिती बदलल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सखोल अभ्यास, नियोजनबद्ध तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेळीपालन व्यवसायाची निवड केली.सुरुवातीला त्यांनी कोटा, सिरोही, सोजत, बारबेरी तसेच देशी जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले. अनुभव आणि अभ्यासातून त्यांना असे लक्षात आले की कोटा जातीच्या शेळ्या अधिक उत्पादनक्षम असून त्यांची वाढ जलद गतीने होते. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे कोटा जातीच्या शेळ्यांच्या संगोपन व व्यापारावर लक्ष केंद्रित केले.

व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी त्यांना राजस्थानातील शेळ्या महाराष्ट्राच्या हवामानात टिकणार नाहीत तसेच हा व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही, असा सल्ला दिला. मात्र राजेंद्र शेंडे यांनी आपल्या अनुभवाने आणि यशाने या सर्व समजुती चुकीच्या ठरवल्या. त्यांच्या मते, कोटा जातीच्या शेळ्या महाराष्ट्रातील उष्णता, पावसाळा आणि थंडी या तिन्ही ऋतूंमध्ये सहजपणे जुळवून घेतात.

उत्कृष्ट पशुपालक म्हणून गौरव

राजेंद्र शेंडे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांचा उत्कृष्ट पशुपालक म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच २०२५ मध्ये आयोजित तालुका पशु-पक्षी प्रदर्शनात उत्कृष्ट बोकड संगोपनासाठी प्रथम क्रमांक मिळाला. याशिवाय २०२६ च्या पशु-पक्षी प्रदर्शनात उत्कृष्ट शेळी-बोकड संगोपन गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

कोटा जातीची वैशिष्ट्ये

कोटा जातीची शेळी साधारणपणे एका वेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. या जातीची वाढ इतर जातींच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक वेगाने होते. या जातीचे बोकड अवघ्या पाच महिन्यांत चांगले वजन प्राप्त करतात. त्यामुळे बकरी ईदच्या काळात त्यांना मोठी मागणी असते.

अलीकडेच राजेंद्र शेंडे यांनी सुमारे ५० बोकडांची विक्री केली. या जातीच्या शेळ्यांना सामान्य हिरवा व वाळलेला चारा पुरेसा ठरतो, त्यामुळे संगोपनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो.

युवकांना देत आहेत मार्गदर्शन

राजेंद्र शेंडे केवळ स्वतःचा व्यवसाय करत नाहीत, तर ग्रामीण भागातील युवकांना शेळीपालनाचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही देत आहेत. त्यांचे मत आहे की योग्य माहिती, तांत्रिक ज्ञान आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय केल्यास तोट्याची शक्यता अत्यंत कमी राहते.

रोजगाराचे नवे साधन

राजेंद्र शेंडे यांच्या मते, सध्या राजस्थानातून मोठ्या प्रमाणात बोकड महाराष्ट्रात आणले जातात. जर महाराष्ट्रातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय स्वीकारला, तर ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक पातळीवर दर्जेदार बोकड उपलब्ध होतील.

भविष्यात कोटा जातीच्या शेळ्या व बोकड स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे आणि युवकांना आत्मनिर्भर बनविणे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.अभ्यास, मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या बळावर ग्रामीण युवकही मोठ्या प्रमाणात यशस्वी उद्योजक बनू शकतात. राजेंद्र रामराज शेंडे यांचे यश हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.

The post गोट फार्म हेच जीवनाचे ध्येय;आमगावच्या तरुणाची रोजगारनिर्मितीची प्रेरणादायी यशोगाथा appeared first on Berar Times.

डाॅ.पटलेंच्या एक वर्ष पदपूर्तीतून आरोग्य विभागात जिल्ह्याचे नावलौकिक
आरोग्य सेवा ही केवळ नोकरी नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून हजारो रुग्णांच्या जीवनात आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकासंह प्रशासकीय यंत्रणेत आशेचा किरण निर्माण करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदावरील यशस्वी कार्यकाळाचा एक यशस्वी टप्पा आज(दि.०९) पूर्ण केला आहे.

सामाजिक जाणीव आणि कष्टाची संस्कृती रुजलेल्या स्वभाव गुणांचे डॉ. पी. के. पटले हे जिल्ह्याच्या मातीतच जन्मले आहेत. तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा या छोट्याशा गावातून जीवनाचा प्रवास सुरू करणारे डॉ. पुरुषोत्तम पटले हे आज जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरकारी आरोग्य सेवेत प्रवेश करताना केवळ करिअर नव्हे, तर समाजसेवेचे ध्येय स्विकारले. आरोग्य विभागातील विविध पदांवर काम करताना त्यांनी ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्यांचा जवळून अभ्यास केला. रुग्णसेवा, शिस्तबद्ध प्रशासन आणि कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्याची त्यांची कार्यशैली त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक गतिमान झाली. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, मातृ-मृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठीचे प्रयत्न, रुग्णालयातील सुविधांचा विस्तार, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. सन २००१ पासून वैद्यकीय सेवेत प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. पटले यांनी माणुसकीचा धागा कधीही तुटू दिला नाही. त्यांच्या दालनाचे दरवाजे सामान्य नागरिकांसाठी नेहमी खुले राहिले. रुग्णांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.

त्यांनी आपल्या १ वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमातर्गंत सन २०२५-२६ एकूण ४१ ह्दय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया ५०० करण्यात आल्या.तसेच सर्वात महागड्या असलेल्या चहिरेपणा शस्त्रक्रिया केल्या.ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे डायलिसीस युनिट पीपीपी कार्यक्रमांतर्गत सुरु करुन १६३९ रुग्णांना डायलिसीची सेवा देण्यात आलेली आहे.ग्रामीण रुग्णालय देवरी व अर्जुनी मोरगाव तसेच उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे रक्त साठवणुक कक्ष सुरु करण्यात आले.सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णलय तिरोडा येथे एक्सरे मशिन सेवा सेंटर व ई.शि.जी. सेवा त्यांच्या कार्यकाळात सुरु करुन ग्रामीण भागातील रुग्णांना एक चांगली सेवा त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा हा ऑयबाल कलैक्शन सेंटर हे प्रथम क्रमाकावर आणण्याकरीता सर्वांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नामुळे आरोग्य विभागात जिल्ह्याला नावलौकिक मिळाले आहे.

आज जिल्हा शल्य चिकित्सक पदावरील डाॅ.पी.के.पटले यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण होत असताना, हा केवळ पदपूर्तीचा क्षण नाहीः तर आरोग्य सेवेतील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणातून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देणारा गौरवाचा कार्यकाळ ठरला आहे. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, अधिक संवेदनशील आणि अधिक लोकाभिमुख बनविण्यात डाॅ.पटले यांचा प्रवास आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

The post डाॅ.पटलेंच्या एक वर्ष पदपूर्तीतून आरोग्य विभागात जिल्ह्याचे नावलौकिक appeared first on Berar Times.

सामाजिक न्याय विभागामार्फत लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ
गोंदिया, दि.8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारांवर चालणारा विभाग असून मागासवर्गीयांचा शैक्षणिक, आर्थिक व सर्वांगिण विकासाकरीता नेहमी प्रयत्नशील असतो. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागामार्फत खालील यशस्वी योजना राबविण्यात येतात.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या खून किंवा मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय संस्थांमध्ये नोकरी देण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय दि.20 नोव्हेंबर 2025 नुसार कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे.

सदर अधिनियमांतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या खून किंवा मृत्यूच्या प्रकरणातील जिल्ह्यात दाखल झालेल्या खून किंवा मृत्यूच्या अनुसूचित जाती 20 व अनुसूचित जमाती 10 असे एकूण 30 प्रकरणांपैकी शासकीय नोकरीकरीता अनुसूचित जाती 16 व अनुसूचित जमाती 9 असे एकूण 25 वारसदारांचे अर्ज पात्र आहेत. सदर कायद्याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या 8 वारसांना दि.20 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गट-ड संवर्गातील शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यातील 3 शासकीय निवासी शाळांमधील 45 विद्यार्थी-विद्यार्थीनींचा दि.13 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत कोलकत्ता येथील सायन्स सिटी, बिरला तारामंडळ, विक्टोरिया मेमोरियल संग्रहालय, बॉटनीकल गार्डन, आय.आय.टी. खडगपूर व व्हीएमआरडीए आयएनएस कुरसुरा पाणबुडी संग्रहालय, विशाखापट्टनम येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यातील नागपूर ते कोलकाता हा विमानप्रवास होता.

मॅट्रिकनंतरच्या शिक्षणाकरीता गोंदिया जिल्ह्यातील 4415 अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना वर्ष 2025-26 मध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या ज्या पालकांचे उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा जास्त आहे अशा पालकांच्या 83 मुला-मुलींना फ्रिशिप योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत 8 वसतीगृह कार्यरत असून 134 मुले व 402 मुली सदर वसतीगृहाचा लाभ घेत आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्यात या विभागामार्फत 3 शासकीय निवासी शाळा कार्यरत असून 173 मुले व 315 मुली शिक्षणाचा लाभ घेत आहेत. इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत सर्व सोयी-सुविधेचा लाभ विद्यार्थी घेत असुन तिन्ही शाळा या आयएसओ नामांकित आहेत.

ज्या मुलांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांचेकरीता शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत असून, सदर योजनेत वर्ष 2025-26 मध्ये 287 विद्यार्थ्यांना 124.00 लक्ष रुपये वाटप करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाने सर्वांना घरे उपलब्ध करुन देणे या ध्येयाअंतर्गत रमाई घरकुल (शहरी) योजनेमध्ये वर्ष 2025-26 करीता 55 घरकुलांचे उद्दिष्ट्ये प्राप्त असून, 25 घरकुलांच्या प्रस्तावांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत शासनाने 45 कामांना मंजूरी दिली असून रु. 4.00 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे, त्यापैकी 15 कामे प्रगतीपथावर आहेत.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकासाकरीता नागरी क्षेत्रासाठी रुपये 1469.00 लक्ष तरतुद उपलब्ध करुन देण्यात आली होती, तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी 1300.00 लक्ष तरतुद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत वर्ष 2025-26 मध्ये 4600.00 एवढा नियतव्यय मंजूर असून त्यामध्ये कृषी व संलग्न सेवेकरीता 531.00 एवढी तरतुद केलेली आहे, जेणेकरून कृषी व दुग्ध व्यवसायामध्ये मागासवर्गीयांची प्रगती होईल. 31 मार्च 2026 अखेर रुपये 4600,00 मंजूर निधी 100 % खर्च करण्यात आला असून, मागासवर्गीयांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

The post सामाजिक न्याय विभागामार्फत लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ appeared first on Berar Times.

‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट
दुष्काळाच्या छायेत आशेचा झरा…

धाराशिवच्या मातीत दुष्काळ नवा नाही…उन्हाळ्याची चाहूल लागली की गावागावातील विहिरींचा तळ दिसू लागतो, बोअरवेल कोरड्या पडतात,टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागतात आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटू लागतात.आकाशात ढग दाटले तरी पाऊस हमखास पडेल याची शाश्वती उरलेली नाही.बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वर्षानुवर्षे घटत चाललेली भूजल पातळी यामुळे धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्यासमोर जलसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.

अशा परिस्थितीत “जलतारा अभियान” हे केवळ प्रशासनाचे अभियान न राहता आशेचा नवा किरण ठरत आहे.कारण ही मोहीम फक्त पाणी अडविण्याची नाही,तर भविष्य वाचविण्याची आहे… पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला सामूहिक संकल्प आहे. पाणी म्हणजे केवळ तहान भागविणारे साधन नाही; ते शेतीचे जीवन,जनावरांचा आधार,ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आणि पर्यावरणाचा श्वास आहे.म्हणूनच आज “पाणी अडवा,पाणी जिरवा” ही संकल्पना घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. जलतारा अभियानातून धाराशिव जिल्ह्यात हीच जाणीव लोकांच्या मनामनात रुजताना दिसत आहे.

गावोगावी तलाव,नाले,ओढे,विहिरी आणि शेततळ्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत.गाळ काढणे,नाले खोलीकरण,बंधारे उभारणे,वृक्षारोपण, जलस्रोत स्वच्छता आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या उपक्रमांमुळे अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. ज्या विहिरी काही वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच कोरड्या पडत होत्या,त्या आता अधिक काळ पाण्याने भरलेल्या राहू लागल्या आहेत.काही भागांत भूजल पातळी वाढल्याचेही चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या अभियानाने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.पूर्वी पाणीटंचाई आली की फक्त शासनाकडे मदतीची अपेक्षा ठेवली जात होती; मात्र आता गावकरी स्वतः पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामांत उतरू लागले आहेत.युवकांचे श्रमदान, महिला बचत गटांचा सहभाग, शेतकऱ्यांचे नियोजन आणि सामाजिक संस्थांची साथ यामुळे “जलतारा” आता लोकचळवळ बनू लागले आहे.

धाराशिवसारख्या जिल्ह्यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे.कारण येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार भूजलावरच आहे.पावसाचे पाणी जमिनीत मुरले तरच विहिरी आणि बोअरवेल जिवंत राहू शकतात.त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविणे ही आता निवड नसून अपरिहार्यता बनली आहे.

The post ‘जलतारा’मुळे धाराशिवमध्ये उगवतेय नवजीवनाची पहाट appeared first on Berar Times.