चिचगड(सुभाष सोनवने)दि.08ः देवरी तालुक्यातील चिचगडसह सहा गावातील 40 हुन अधिक शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना मागील वर्षात घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आठवण करीत असतानाच अचानक मुल्ला येथील शेतकरी भरतरामजी डुंबरे गट न.२६१ क्षेत्र ०.५८ मधील धानाचे पुंजने अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना समोर आली आहे.