गोंदिया(खेमेंद्र कटरे): महाराष्ट्र लगत असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला व सिवनी जिल्ह्यात माओवाद्यांचा वावर वाढला आहे. कान्हा केसरी व्याघ्र प्रकल्पाच्या भागात सध्याघडीला माओवाद्यांच्या हालचाली दिसून येत आहे. तीन दिवसापुर्वी झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली. या पाश्र्वभुमीवर माओवाद्यांच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय रिझव्र्ह बटालियन (सीआरपीएफ) तैनात करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मंडला जिल्ह्यातील कान्हा जंगलातून माओवादी छत्तीसगड राज्यातून प्रवास करुन येतात. माओवाद्यांनी या भागात आपले प्रस्थ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जंगलाच्या मार्गाने गावात पोहोचून गावकèयांशी बैठक घेतात. त्यांना बंदुकीचा धाक दाखवितात. पाहिजे ते साहित्य जबरस्तीने गोळा करतात. नागरिकाांच्या माध्यमातून पोलिसांना लक्ष्य करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांनाही सतत त्राद देण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात माओवाद्यांची वाढती संख्या बघून त्यांच्यावर नजर ठेवण्यास त्यांच्या हालचालीू उधळून लावण्यासाठी बालाघाटसह मंडला जिल्ह्यातील माओवादग्रस्त भागात लवकरच केंद्रीय राखीव दलाची तुकडी मिळणार आहे. असे बालाघाट-मंडला विभागाचे पोलीस महानिरीक्षक के.पी. व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले. माओवादग्रस्त बालाघाट आणि मंडला जिल्ह्यातील बस्तरमधील माओवादी कबीरधार ते भोरामदेव अभयारण्यापर्यंत दलमचा विस्तार करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी पोलीस सतत शोध मोहीम राबवून गावकèयांशी संवास साधत माओवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. आता माओवाद्यांच्या संपूर्ण बिमोडसाठी केंद्रीय राखीव दलाची आणखी एक तुकडी मिळणार आहे. १५०० सैनिकांची अतिरिक्त संख्या उपलब्ध राहणार आहे.
परिक्षेत्रात कार्यरत माओवादी संघटन
या भागात तांडा दलम, मलाजखंड दलम, परसवाडा दलम, कान्हा-भोसा दलम, केबी विभाग, विस्तार दलम, खटिया-मोचा दल, देवरी-कुरखेडा दलम यासह इतर दलमच्या माध्यमातून माओवादी ग्रामीण भागात शिरण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत.
कान्हा जंगलात हालचाली वाढल्या
छत्तीसगड राज्यातून येऊन माओवादी कान्हा केसरी व्याघ्र प्रकल्पाच्या भागात सध्या आपले प्रसथ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडे या भागात माओवाद्यांच्या हालचाली दिसून येत आहे. ६ नोव्हेंबरला कान्हा बफर क्षेत्रात मालखेडी गावात पोलीस आणि माओवाद्यांची चकमक झाली.