महाज्योतीच्या सर्व योजना कागदावरच

0
214

गोंदिया: साारथी आणि बार्टीच्या धर्तीवर इतर मागासवर्गातील स्पर्धा परीक्षार्थीॅना प्रशिक्षण व आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या महाज्योती संस्थेला सरकारने अद्याप एकही पैसा दिलेला नाही. सरकारने करोनाकाळातही सारखीला ११ कोटीची मदत करुन १३० कोटीच्या नवीन प्रस्तावाला मंजूरी दिली. मग ओबीसी विद्यार्थी सरकारचे नाहीत का, असा सवाल आता विचारला जात आहे. सरकारच्या या दुजभावामुळे एकही विद्यार्थी अद्याप महाज्योतीचा लाभार्थीॅ नाही.
इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्ती जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गाचा सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने महाज्योती अर्थात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. गेल्या दहा वर्षापासून बार्टी तर एक वर्षापासून सारथी या संस्थेद्वारे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दिल्लीतील नामवंत शिकवणी वर्गामध्ये मार्गदर्शन केले जाते. याद्वारे दिल्लीतील प्रशिक्षणासाठी २ लाख ५० हजार रुपये, निवासासाठी १ लाख ५० हजार रुपये, पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्याथ्र्यांना ५० हजार रुपये तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्याथ्र्याला समोरील प्रशिक्षणासाठी २५ हजार रुपये दिले जातात. परंतु वरील दोन्ही योजना या फक्त अनुसूचित जाती व मराठा-कुणबी या वर्गासाठीच असल्यामुळे आजपर्यंत एकाही ओŸबीसी विद्याथ्र्याला याचा लाभ मिळाला नाही. या वर्षीॅसुद्धा बार्टी व सारथी या दोन्ही संस्था नागरी सेवा पुर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्याथ्र्यांना मुख्य परीक्षेच्या दर्जेदार प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मदत करणार अहेत. या धर्तीवर महाज्योतीतर्फे या वषर्Ÿी योजना सुरु करणे अपेक्षीत होते. मात्र सरकारकडून महाज्योतीला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही.