दारूची तस्करी करणार्‍या तरुणीला अटक

0
82

नागपूर,-गावठी दारूची तस्करी करणार्‍या भीमसेनानगर, भिवसन खोरी येथील विशुधा सचिन हाडके (23) या दुचाकीस्वार तरुणीला मानकापूर पोलिसांनी अटक केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी दोन दिवस शहरातील दुकाने बंद आहेत. दुकाने सुरू आहेत काय याचा आढावा घेण्यासाठी मानकापूर पो. स्टे. पोलिस पथक परिसरात फिरत होते. त्यावेळी गोरेवाडाकडून मानकापूरकडे जाणार्‍या नवीन शफीनगर पुलाजवळ एक तरुणी तोंडाला फडके बांधून एमएच 31 ईझेड 7440 क्रमांकाच्या अ‍ॅक्टीवाने जात होती. दुचाकीच्या पायदानावर काळ्या रंगाची पिशवी होती. सदर तरुणीवर संशय आल्याने तिला अवस्थीनगर चौकात थांबवून दुचाकीची झडती घेतली असता पिशवीत गावठी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. दुचाकी आणि गावठी दारूसह पोलिसांनी 39 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी महिला पो. नि. वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. रामेश्वर गिते, शिपाई राजेश वरठी, हितेश फरकुडे, प्रवीण भोयर, महिला शिपाई सुमित्रा येवले यांनी केली.