
भंडारा-पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या आदेशावरून तुमसर येथील दोन टोळीवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कुख्यात गुन्हेगारांचा अंत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांची बैठक बोलावून अट्टल व कुख्यात गुन्हेगारांची यादी मागवून त्यांच्यावर मकोका, एमपीडीएअंतर्गत हद्दपार व तडीपार करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. निर्देशावरून तुमसर येथील दोन टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यात टोळी प्रमुख दिनेश उर्फ डाल्या मेश्राम (48), त्याचे साथीदार शुभम उर्फ झब्या देवेंद्र कटकवार (24), मनोज देविदास कानेकर (26), भूपेंद्र मोहन गिलोकर (35), मयूर उर्फ गप्प्या रविकांत सांडेकर (24 ), रत्नपाल निसार शेख (38), नईम सिराज शेख (28) व दुसèया टोळीचा टोळी प्रमुख सतीश चंदन दहाट (28), त्याचे साथीदार संतोष चंदन दहाट (32), सौरभ नंदकिशोर माने (24), मंगेश प्यारेलाल गेडाम (24), जितू अशोक बन्सोड सर्व रा. तुमसर यांनी स्वत:चे वर्चस्व स्थापन करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी राजरोजसपणे अवैध धंदे व टोळी युद्ध सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मोक्कातंर्गत विशेष महानिरीक्षक नागपूर चिरंजीव प्रसाद यांनी मोक्का अन्वये कलम वाढ करण्याचा ठराव पास केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात भीतीने खळबळ माजली आहे. सदरचा प्रस्ताव हा जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, तुमसरचे ठाणेदार रामेश्वर पिपरेवार, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार, संजय टेकाम, सुधीर मडामे, नायक दिनेंद्र आंबेडारे, पंकज भित्रे, श्रीकांत पुडके आदींनी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलिस स्टेशन तुमसर यांनी संयुक्तपणे उत्तमरित्या पार पाडली.
कुख्यात गुन्हेगारांचा अंत करण्यासाठी गुन्हे दाखल – जाधव
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीचा वापर करून अशा कुख्यात गुन्हेगारांचा अंत करण्यासाठी म्हणून वेगळी पद्धत अवलंबिल्याचे ठरविले. अशा गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी वेळोवेळी त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए अंतर्गत हद्दपार व तडीपार करण्याचा बेत आखल्याचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.