41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता दोन चोरट्यांसह 3.15 लाखांचा मुद्येमाल ताब्यात

दोन चोरट्यांसह 3.15 लाखांचा मुद्येमाल ताब्यात

0
134

blank

गोंदिया,-शहरातील हेमू कॉलनी येथे घरफोडी करुन 3 लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने रोख चोरी करणार्‍या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. बबन भागडकर व सुनिल गेंडरे अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेमू कॉलनी येथील कन्हय्यालाल चंदवानी हे 24 जून रोजी रात्री शहराबाहेरील एका सभागृहात लग्नासाठी सहकुटूंब गेले होते. ही संधी साध्ून बबन भागडकर (24, रा.मरारटोली) व सुनिल गेंडरे (20, रा.झोपडी मोहल्ला) यांनी घरफोडी करुन 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 95 हजार रुपये रोख असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्येमाल चोरी केला. याप्रकरणी चंदवानी यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान पोलिसांना चौकशीत आरोपींना अटक केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्येमाल जप्त केला असून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत भुजबळ, सपोनि सागर पाटील, पोना जागेश्वर उईकके, सुबोधकुमर बिसेन, सतीश शेंडे, ओमेश्वर मेश्रम, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, योगेश बिसेन, दीपक रहांगडाले, छगन विठ्ठले, विकास वेदक, शहारे यांनी केली.

blank