वीज पडल्याने शेतात बांधलेल्या 9 पैकी दोन म्हशी ठार

0
43

तिरोडा, दि.30 : तिरोडा नगर परिषद क्षेत्रांतर्गत येणार्‍या लोधीटोला येथील शेतकरी रविकुमार लिल्हारे यांच्या धादरी-उमरी मार्गावरील शेतात 9 म्हशी बांधलेल्या होत्या. अचानक विजांचा कडकडाट झाला व 9 पैकी दोन म्हशींवर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. ही घाटा  मंगळवार, दि.29 रोजी सायंकाळी 5.35 वाजता घडली.

सदर घटनेची माहिती तलाठी, तहसीलदार, ठाणेदार व पशूवैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आली. तलाठी नरेश उगावकर, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.गंगापारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाही केली. दोन्ही म्हशींची किंमत 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. सदर आपत्तीग्रस्त शेतकर्‍याची आर्थिक स्थिती कमजोर असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.