कुपंनाच्या वादातून वृद्धेचा खून;सुकडीटोला येथील घटना

0
42

तिरोडा-कुंपनाच्या वादात मारहाणीत जखमी झालेल्या 65 वर्षीय वृद्ध महिला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सुकडीटोला येथे 29 जून रोजी घडली. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सायत्रा शालीकराम बर्वे असे मृत महिलेचे तर राजेश ताराचंद मारबते (35) असे आरोपीचे नाव आहे.
मृतक व आरोपीमध्ये 28 जून रोजी कुंपनाच्या जागेवरुन वाद झाला. यावेळी आरोपीने सायत्राबाईला जीवे मारण्याच्या उद्देशाने काठीने बेदम मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. फिर्यादी बाबुलाल शालिकराम बर्वे (36) यांच्या तक्रारीवरुन तिरोडा पोलिसांनी 307 भादंविनुसार गुन्हा नोंद केला होता. सायत्राबाईंवर तिरोडा येथे उपचार सुरु असताना  29 जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे यांच्या पथकाचे सितेपार येथून आरोपीला अटक केली व कलम 302 भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि केंद्रे करीत आहेत.