महिलेस जखमी करणार्या आरोपीला साडेतीन वर्षाची शिक्षा

0
27

गोंदिया,दि.08ः-गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत गुदमा परिसरात एका महिलेच्या पोटावर चाकुने वार करुन जखमी करुन मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणातील आरोपीला साडेतीन वर्षाची शिक्षा व 200 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत दिनांक 10 व 11 आक्टोंबर 2012 च्या दरम्यानची असून याप्रकरणातील आरोपी पवित्र उऱ्फ मोून उर्फ विक्की नरेंद्र मेश्राम रा.छोटा गोंदिया याने घटनेच्या दिवशी तक्रारदार महिलेला आपल्या दुचाकीवर बसवून तिला तिच्या स्वगावी न सोडता गुदमा परिसरात नेऊन तिच्या पोटावर चाकुने वार करुन जखमी केले होते.याप्रकरणाची तक्रार सदर फिर्यादी महिलेने नोंदवल्यानंतर आरोपीविरुध्द कलम 363,364,307,34 भांदवी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला होता.या प्रकरणात प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश श्री औटी यांनी सुनावनी दरम्यान दोन्हीबाजूच्या वकिलांचे म्हणने एैकून घेत आरोपी विक्की नरेंद्र मेश्रामला 3 वर्ष 6 महिने तसेच 200 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी वकिल म्हणून एॅड पुरुषोत्तम आगाशे यांनी बाजू माडंली.तर गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार आत्माराम टेंभरे यांनी कामकाज पाहिले.