अरसोडा शेतशिवारात १८ चुंगळी मोहसडवा नष्ट

0
37
गडचिरोली.– आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथील जंगलालगत असलेल्या शेतशिवारात गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने मंगळवारी संयुक्त कृती करीत जवळपास २५ हजार रुपये किमतीचे १८ चुंगळी मोहसडवा नष्ट केला आहे.
तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या अरसोडा गावात अवैध दारूची विक्री केल्या जाते. गावात १० अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. यामुळे परिसरातील गावकरी त्रस्त आहेत. अरसोडा जंगलपरिसरानजीकच्या शेतशिवारात विक्रेत्यांनी दारू अड्डे व मोहसडवा टाकून ठेवला असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. त्यानुसार गाव संघटनेचे सदस्य व मुक्तीपथ तालुका चमूने शेतशिवारात शोधमोहीम राबविली. दरम्यान तीन ठिकाणी दारू अड्डे व  १८ चुंगळी मोहसडवा आढळून आला. दारू गाळण्याचे साहित्य व मोहसडवा नष्ट करण्यात आला.