30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिकेची आत्महत्या

नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिकेची आत्महत्या

0
127

blank

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्या ५६ वर्षांच्या होत्या.

सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बेलतरोडी इथल्या फॉर्च्युन श्री अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन डॉ. मेश्राम यांनी आत्महत्या केली. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात होते.त्यांचे पती सुधीर मेश्राम हे माजी कुलगुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्या बेलतरोडी इथल्या नातलगांकडे रहायला आल्या होत्या. त्यांना एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो. आठ दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून आपल्या मुलाला भेटून परत आल्या होत्या. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

blank