Home गुन्हेवार्ता धनोडीत पोलिसांची जुगारावर धाड;3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

धनोडीत पोलिसांची जुगारावर धाड;3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

चांदूर रेल्वे-तालुक्यातील व तळेगाव दशासर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या धनोडी येथे जुगारावर धाड टाकून 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई 28 ऑगस्टला करण्यात आली. गुप्त माहितीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी ही कारवाई केली.
घटनास्थळावरून पत्ते, 2700 रुपये व सर्व आरोपीचे अंगझडतीत जुगारात वापरलेले नगदी 22 हजार 380 रुपये, तीन साधे मोबाईल एकूण 3 हजार रुपये, दोन अँड्रॉइड मोबाईल किंमत 10 हजार रुपये असे एकूण 13 हजार रुपयांचे मोबाईल तसेच घटनास्थळी आरोपींनी जुगार खेळण्यासाठी आणलेल्या एकुण 6 मोटारसायकली किंमत 3 लाख रुपये असा एकूण 3 लाख 38 हजार 105 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
प्रल्हाद विठ्ठलराव भाले (48 वर्ष, रा. मांजरखेड कसबा), दिवाकर किसनराव राऊत (32 वर्ष, रा. सावंगा विठोबा), श्रीकृष्ण कवडूजी शेंडे (40 वर्ष, रा. धनोडी), मनोज लहानबाजी पुरी (40 वर्ष, रा. धामणगाव रेल्वे), विलास रंगराव झाडे (40 वर्ष, रा. धनोडी) व आशिष जनार्दन कळस (27 वर्ष,रा. सुपलवाडा) यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई केली. सदरची कारवाई तळेगावचे ठाणेदार अजय ठाकरे यांच्या आदेशाने एएसआय वसंत राठोड, संजय भोपळे, प्रफुल वानखडे, दीलीप सावंत, श्यामकुमार गावंडे, गजेंद्र ठाकरे, पवन महाजन, अमर काळे, बंडू मेश्राम, संदीप चव्हाण, अंकुश पाटील, प्रदीप मस्के, महिला पोलीस स्वाती शेंडे यांनी केली.

Exit mobile version