Home गुन्हेवार्ता डोंगरगाव डेपो येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

डोंगरगाव डेपो येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

0

देवरी,दि.13- देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरगाव डेपो येथे एका शेतशिवारात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी काल रविवारी(दि.12) धाड टाकून एकूण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा माल हस्तगत केला. या कार्यवाहीत देवरी पोलिसांनी सहा इसमांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव डेपो येथील अनिल बाबुराव कुलभजे यांच्या शेतातील झोपडीत काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर देवरी पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून  हेमंत तरोणे (43), अनिल कुलभजे (43), घनश्याम मेश्राम (45)आत्माराम शिवणकर (52), अशोक ढोमणे (41) सर्व राहणार बाम्हणी आणि इतर एक अशा सहा इसमांना रंगेहात पकडले.  या आरोपींकडून नकदी 3 हजार 10 रुपये, 2 मोबाईल आणि 4 दुचाकी असा 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर कार्यवाही ही ठाणेदार सिंगणजुडे यांचे नेतृत्वात नायक परसमोडे, चौधरी शिपाई डोहळे, धरमे, नेवारे, बोपचे यांनी केली.

Exit mobile version