विद्युत शॉक लागून युवकाचा मृत्यू

0
127

आरमोरी-रस्त्यावरील विद्युतचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढलेल्या युवका शॉक लागल्याने तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथे घडली. ओमकार भोलानाथ नामदेवार (वय २५) असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथील युवक ओमकार नरदेलवार व ठाणेगाव डोंगरगाव येथील लाइनमेन करणसिंह चंदेल हे विद्युतचे काम करण्यासाठी ठाणेगाव येथील हेमांडपंती मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर विद्युतचे काम करण्यासाठी ओमकार हा खांबावर चढला. मात्र वीज प्रवाह सुरू असल्याने त्याच्या हाताला करंट लागल्यामुळे तो खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता भोयर यांना फोनवरून देण्यात आली. त्याला तत्काळ आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आई-वडीलाला एकुलता एक मुलगा होता. परिसरात गुड्डू म्हणून परिचित होता आणि शेवटी गुडू हा अनपेक्षित पण निघून गेला याची भरपाई कधीही निघणारी नाही. वीज वितरण कंपनीचे अभियंता बोबडे, भोयर यांना विचारणा केली असता सदर ओमकार नारदेलवार हा विद्युत शाक लागून मृत्यू पावल्यामुळे त्याला शासनातर्फे आर्थिक मदत मिळवून देणार असल्याची, अशी ग्वाही ओमकारच्या नातेवाईक, आई-वडिलांना दिले.