
सडक अर्जुनी:दि.7 ::–नवेगावबांध वनपरिक्षेत्र अंतर्गत बोरटेकडी सहवनक्षेत्रातील बीट सुरतोली-१ मधील कक्ष क्र.७३१ संरक्षित वन मध्ये बीटरक्षक गस्त करीत असता इटियाडोह धरणाचे बुडीत परिसरात ३ संशयित व्यक्ती हातामध्ये रासायनिक खतांच्या पोतळी पासून तयार केलेली पिशवी घेवून संशयितरित्या दिसले. त्यांना अडवून चौकशी केली असता पिशवी मध्ये वन्यजीव राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आले.त्याचा गळा कापलेला होता.त्याच पिशवीमध्ये वन्यप्राणी वाघ,बिबट यांची शिकार करण्यातकरिता वापरण्यात येणारे लोखंडी स्प्रिंग सापळा एक नग मिळाले.तेव्हा त्यांची विचारपूस केली असता त्यांनी वन्यजीव मोराची शिकार सदर सापळ्याचे साहाय्याने इटियाडोह धरण बुडीत परिसरात नाल्याचे पोटात केल्याचे कबूल केले. सदर स्प्रिंग सापळा कुठून आणला असे विचारले असता दौलत सलामे येरंडी/दर्रे यांचे कडून आणल्याचे सांगितले.त्यानंतर आरोपी चिंतामन सुकलू भोगारे वय ६५ येरंडी/दर्रे,मेहतलाल चिंतामन भोगारे वय२५ येरंडी/दर्रे,सकेश्वर लहू मडावी वय ४० परसटोला, दौलत हिरामण सलामे वय ४५ येरंडी/दर्रे,इदंल काशिराम सलामे वय ४७ येरंडी/दर्रे वन्यजीव राष्ट्रीय पक्षी मोर व साहित्य जप्त करून पंचासमक्ष पंचनामा करून पुढील कारवाई करिता ताब्यात घेऊन याप्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
आरोपींची प्रथमदर्शनी चौकशी करून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांचे समोर हजर करण्यात आले.त्यानुसार आरोपी चिंतामन सुकलू भोगारे वय ६५ येरंडी/दर्रे यांनी वनगुन्हा प्र. सु.री. क्र. ०४१३३/१०३३०४/२०२२,कलम भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३२(१)(जे),३३,वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,२९,३१,३९,५०व५१ नुसार अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगावबांध(प्रा) आर .आय .दोनोडे,सुरतोली-१ चे बीटरक्षक एस.यु.धनस्कर व वनकर्मचारी यांनी केली आहे.