
* आमगाव तालुक्यातील पानगाव येथील घटना
* जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ. पटले यांची घटनास्थळी भेट
गोंदिया- जिवंत विद्युत पुरवठा होत असताना तुटलेल्या ताराचा लोखंडी सलाख व कपडे वाळविण्याचा लोखंडी ताराशी संपर्क आल्याने कपडे वाळविण्यासाठी गेलेल्या महिलेचा व त्यानंतर बैलाचा विद्युत करंट लागून घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना आमगाव तालुक्यातील पानगाव येथे आज दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजे दरम्यान घडली. मृतक महिलेचे नाव प्रेमकला जितेंद्र पटले (34) रा. पानगाव असे आहे.
मृतक महिला ही नित्याप्रमाने कामे आटोपून मोठ्या बाजूच्या आंगणात असलेल्या लोखंडी तारावर कपडे वाळविण्यासाठी गेली असता या ताराला विद्युत करंट असल्याने महिलेला करंट लागून तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांनी लाकडी काठीने विद्युत ताराला बाजूने सारले. यावेळी सदर विद्युत प्रवाही तार जवळच असलेल्या बैलाच्या आंगावर पडल्याने बैलाचा ही घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसाना देण्यात आली असून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. घटनेची माहिती जिल्हा पशू संवर्धन अधिकारी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मृतक महिलेचा पती हा कामा निमित्त दुसऱ्या राज्यात गेला असून त्यांना दोन मुले आहेत. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.