धावत्या रेल्वे गाडीतून पडून मजूर जखमी

0
39

सडक अर्जुनी::— तालुक्यातील सौंदड रेल्वे येथे आज २९ मे ला सकाळी ८.१० मिनिटांनी सौंदड-राका रोडवरील रेल्वे फाटकाजवळ ५० मी. अंतरावर एक मजूर धावत्या रेल्वे गाडीतून पडून जखमी झाल्याची घटना घडली.जखमी मजूराचे नाव मनोज सुनिल साहनी वय २८ वर्ष या. समरीतभेंडी जिल्हा समरीतपूर ठाणा कल्याणपूर बिहार येथील रहिवासी आहे.सदर मजूर गाडी क्र.१७००७ हैद्राबाद-दरभंगा सुपरफास्ट एक्स्प्रेसने स्वगावी जात होता.हैद्राबाद-दरभंगा सुपरफास्ट एक्स्प्रेस या धावत्या रेल्वे गाडीतून पडला. रेल्वे फाटक बंद असल्याने नंदीपिंडी चुलबंद नदीपात्रातून रेती वाहतूक करणारा टिप्पर उभा असतांनी टिप्परच्या ड्रायव्हरची नजर पडलेल्या इसमाकडे जाताच टिप्पर ड्रायव्हर खाली उतरून सरळ रेल्वे लाईनकडे धावून त्या पडलेल्या इसमाचे खिशातून पाकीट व मोबाईल काढले,व टिप्परकडे जाऊन पडतांनी त्याला पाहिले.त्यामुळे लोकांना शंका आली की,हा रेल्वेलाईन कडे कशासाठी गेला? रेल्वे फाटकाजवळ गंगाधर मारवाडे,राकेश रहिले,नरेश टेंभुर्णे यांनी रेल्वे लाईनने ५० मी. अंतरावर जाऊन पाहिले असता रेल्वे लाईनला लागून एक इसम झुडूपात पडल्याचे दिसले.तेव्हा राकेश रहिले यांनी १०५ नंबर वर काॅल केले असता अम्बुंलन्स व कोणतेही वाहन वेळेवर पोहचले नाही. ३५ ते ४० मिनिटांनंतर नरेश टेंभुर्णे यांनी काळीपिवळी आणून त्या जखमी इसमाला सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.तेथील डॉ.प्रजापती , मनिषा राऊत,प्रिती पटले, लिलाधर ब्राम्हणकर,टेंभुर्णे यांनी त्यांचेवर प्रथमोपचार करुन जखमी मजूराला गोंदिया येथे के.टी.एस. जिल्हा रुग्णालयात रेफर केले.जखमी मजूराचे हात ,पाय व डोक्याला मार लागला असून चार टाके लागले आहेत. तिकडे मोबाईल नेणा-या टिप्पर क्र. एम.एच.४०,बीजी-४६२७ टिप्पर मालक महेश शंकर डुभंरे कोहमारा असून त्या टिप्परचा ड्रायव्हर योगेश याला लोकांनी टिप्पर रोखून जखमी इसमाचे मोबाईल व पाकिट मागितले.पण त्या ड्रायव्हरने फक्त मोबाईल आणल्याचे सांगून मोबाईल परत केले.ग्रामीण रुग्णालयात जावून जखमीला त्याचे मोबाईल परत करण्यात आले.त्याचे पाकिट मिळाले नाही.त्या टिप्परचे ड्रायव्हरने जखमीला उपचारासाठी न नेता मोबाईल काढून पळ काढला.सदर जखमी इसम बिहार राज्यातील असून तो कामावरून आपले स्वगावी गावाकडे जात होता.त्या इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.प्रजापती यांनी सांगितले.व मोबाईल वरून त्यांचे कुटुंबीयांना माहिती देऊन त्यांची बोलणी करून दिली.