धारदार शस्त्राने युवकाचा खून

0
32

भंडारा-भंडारा ते वरठी मार्गावरील गणेशनगरीजवळील राज्य मार्गावर एका युवकाचा धारदार शस्त्राने निघृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (१0 जून) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. राहुल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (वय ३0, रा. टाकळी (भंडारा) असे मृतकाचे नाव आहे.
राहुल हा सकाळी काही कामानिमित्त गणेशनगरी परीसरात आपल्या दुचाकीने आला होता. दरम्यान, त्याच्या मागावर असलेल्या गुंडांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर घातली. त्यामुळे तो खाली कोसळला. याचा फायदा घेत धारदार शस्त्राने गुंडांनी त्याच्यावर सपासप वार करून त्याला ठार केले. राहूलच्या शरिरावर तब्बल २६ वार होते.
खून करण्याचे ठोस कारण समजू शकले नसले तरी मृतक आणि आरोपी यांच्यात जुना वाद असल्याचे सांगितले जाते. मृतक राहुल हा हार्डवेअरचे काम करीत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलिस ठाण्याचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कचरु चोपकर रा. शुक्र वारी भंडारा आणि बग्गा गाते रा. हलदरपुरी भंडारा या दोन आरोपींची ओळख पटविली आहे. त्यांच्यासोबत आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.