36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता अब्दुलटोला नजिक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

अब्दुलटोला नजिक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

0
119

देवरी,दि.12- देवरीपासून दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावरील अब्दुलटोला शिवारात आज दुपारी 12च्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. देवरी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मृताचे नाव बाबूराव गोपाल मलये (वय 45) राहणार मुल्ला असे आहे.

सविस्तर असे की मुल्ला येथील रहिवासी असलेले बाबूराव मलये हे आपल्या दुचाकीने पत्नीसह चिचगड येथे खासगी कामानिमित्त जात होते. देवरीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील शिवारात वळणावर उभ्या असलेल्या एका कारला धडक बसून चिचगड कडून देवरीच्या दिशेने येणाऱ्या एका दुसऱ्या वाहनाशी त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने बाबूराव हे जागीच ठार झाले. मृताची पत्नी बाजूला फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

blank