पोलिस अधिक्षकाच्या जाचाला कंटाळून पोलिस जमादाराची आत्महत्या

0
108

यवतमाळ,दि.18ः- जिल्ह्यातील बिटरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या परंतु आजारपणामुळे सुट्टीवर असलेल्या विष्णू सखाराम कोरडे या पोलिस जमादराने शुक्रवार 17 जून रोजी सकाळी लक्ष्मीनगर येथील राहत्या घरात लुंगीने गळफास घेऊन Suicide आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे मृतकाने लिहून ठेवलेल्या ‘Suicide सुसाईड नोट’मध्ये पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे
आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर विष्णू कोरडे यांच्यावर स्मशानभूमीत संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाणेदार दिनेश शुक्ला आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कै.विष्णू कोरडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि मोठा परिवार आहे. पुसद शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.