३ कोटी ३० लाखाची अफरातफर प्रकरण,नागमोतीची जामीनावर सुटका

0
56

जागृती सहकारी संस्था मर्या. मुंडीकोटा येथील प्रकरण: एक लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका

गोंदिया, दि.18 : जागृती सहकारी संस्था मर्या. मुंडीकोटा येथील ३ कोटी ३० लाख ७१ हजार ३२५ रूपयाची अफरातफर प्रकरणी तिरोडा पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीला दिड वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १ लाख रूपयाच्या जातमुचलक्यावर जामीन दिलेला आहे. हा जामीन १३ जून रोजी दिला आहे.

नागपूरच्या आदिवासी कॉलोनी, तुकडोजी चौक येथील भाऊराव नत्थुजी नागमोती (५८) याला ३ कोटी ३० लाखाच्या अपहार प्रकरणीे २ जानेवारी २०२१ रोजी अटक केली होतीे. जागृती सहकारी संस्था मर्या. मुंडीकोटा या पतसंस्थेच्या ६ हजार ३३५ सभासदांचे पैसे हडपण्यात आले होते. ही पतसंस्था चालविण्याकरीता १३ संचालक १ कार्यकारी मुख्याधिकारी आणि ११ शाखा अधिकारी होते. सभासदांनी या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी (रक्कम) परत मिळत नाही म्हणून संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांच्याकडे केली होती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी उप लेखापरीक्षक गणेश हलमारे यांना पाठवून अंकेक्षण अहवाल तयार करायला सांगितले. त्या अहवालात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ११ शाखेचे फेर लेखापरिक्षण केले.फेरलेखा परीक्षणामध्ये आरोपींनी संस्थेमध्ये उपविधीनुसार संस्थेचे कार्य पार पाडले नाही, मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप, मुदतीठेवी व दैनिक बचत अभिकर्ता यांचेकडुन सामान्य जनतेकडून ज्या ठेवी संस्थेच्या नावाने स्वीकारले आहेत त्या रक्कमाचा विनीयोग कर्जवाटप, गुंतवणूक, रोख तरलता यामध्ये न होता कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन, ठेवीदार बक्षीस खर्च, मानधन, मजूरी, पेंटींग, ईमारत सजावट, संगनक रिपेअरींग खर्च, अभिकर्ता-कर्मचारी, मार्गदर्शक कर्मचारी, बोनस देणगी, प्रिंटींग, संस्था भविष्य निधी, संगणक प्रणाली देखभाल, स्टेशनरी यावर अधिक प्रमाणावर खर्च करून ३ कोटी ३० लाख ७१ हजार ३२५ रूपयाची फसवणूक केल्याचा भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, सहकलम ३, ४, महाराष्ट्र ठेविदारांच्या हित संबंधाचे संरक्षनाचे अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला होता.  नागमोती यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. नागमोती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने दिड वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे.