
सोलापूर –राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दिनांक 19 जून रविवारी पहाटे 3.30 वाजता सोलापूर शहरातील गेंट्याल टाकीज चौक येथे सापळा रचून एका टेंपो वाहनातून गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याचा एकूण रुपये 8 लाख 40 हजार 960 किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर यांनी 19 जून रोजी पहाटे ३.३० वाजता सोलापूर शहरातील गेंट्याल चौक येथे एका टाटा 407 टेंपो वाहनातून विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला. त्यानुसार टेंपो क्रमांक MH 04 EB 6050 या वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात दोन इसम नामे शिवा बाबू राठोड, राहणार विजापूर व इरेश गंगाधर नावडे, राहणार, भवानी पेठ सोलापूर आढळून आले. त्यांना सदर वाहनात काय आहे? अशी विचारपूस केली असता त्यात विदेशी दारू असल्याचे त्यांनी सांगितले.