विनापरवाना बियाणे व कीटकनाशक विक्री; विक्रेत्यावर गुन्हा दाखल

0
44

गोरेगाव, दि.22 : भरारी पथकामार्फत विनापरवाना बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर मौजा मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव येथे सोमवार, 21 जून रोजी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये एकूण पाच लाख 29 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. (Sale of unlicensed seeds and pesticides)

विना परवाने बियाणे व कीटकनाशक विक्री करणारा उमेश श्रावण गौतम याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात बियाणे नियंत्रण आदेश 1983, कीटकनाशक कायदा 1968, कीटकनाशक नियम 1971, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, नुसार FIR क्रमांक 310 दिनांक 21/06/2022 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी एम के मडामे, तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बावनकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोंदिया, एस.जे. पाटोळे तालुका कृषी अधिकारी गोरेगाव, राजेश रामटेके कृषी अधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांनी केली.