दुचाकी चोरणार्‍या चार आरोपींना अटक

0
30

भंडारा-स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरी करणार्‍यांना चार आरोपींना अटक केली. त्यात एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडुन पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. रोशन दिनेश कोचे (२३) रा.अड्याळ, ह.मु.वडसा जि.गडचिरोली, विरु प्रभाकर कोटांगले (२३) रा.अड्याळ, ईरफान उर्फ सुलतान ईस्त्राईल शेख (२८) रा.अड्याळ व एक विधी संघर्षग्रस्त बालक असे आरोपींची नावे आहे आहेत.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोरीच्या घटनेवर आळा बसविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा कोसरा (कोंढा) येथून घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पोलिस स्टेशन अड्याळ येथे करण्यात आली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की चोरीच्या वाहनाची विक्री लाखांदूर येथे होणार आहे.
या आधारावर पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचे मार्गदर्शनात एपीआय सौरभ घरडे, एएसआय धर्मेंद्र बोरकर, पीएन राजू दोनोडे, सतिश देशमुख, शैलेश बेदुरकर, ईश्‍वरदत्ता मडावी, योगेश पेठे, सुनील ठवकर, चालक हरीदास रामटेके, आशिष तिवाडे, अमोल खराबे यांचे एक पथक तयार करुन लाखांदूर येथे पाठविले. पथकाने लाखांदूर येथे सापळा रचून चोरीच्या वर्णनाची गाडी चालविणार्‍या रोशन दिनेश कोचे (२३) रा.अड्याळ, ह.मु.वडसा जि.गडचिरोली यास मोठय़ा शिताफीने ताब्यात घेतले. त्याला दुचाकी बाबत विचारपूस केली तेव्हा त्याने इतर विरु प्रभाकर कोटांगले (२३) रा.अड्याळ, ईरफान उर्फ सुलतान ईस्त्राईल शेख (२८) रा.अड्याळ व एक विधी संघर्षग्रस बालक यांच्याशी संगणमत करुन वडसा येथून दोन दुचाकी, लाखांदूर, मौजा लिंगमारा, जि.बालाघाट (म.प्र.) येथून अशा पाच दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले. चारही आरोपींना अटक करुन अड्याळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून ५ दुचाकी जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई एपीआय सौरभ घरडे, एएसआय धर्मेंद्र बोरकर, पीएन राजू दोनोडे, सतिश देशमुख, शैलेश बेदुरकर, ईश्‍वरदत्ता मडावी, योगेश पेठे, सुनील ठवकर, चालक हरीदास रामटेके, आशिष तिवाडे, अमोल खराबे यांनी सदरचे गुन्हे अथक पर्शिमाने उघडकीस आणले.