
गडचिरोली- सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करून काढून देण्याच्या कामाकारिता कुरखेडा नगर पंचायतीमधील लिपीका ५ हजारांची लाच घेताना आज २८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. देवीदास मुखरू देशमुख (४५) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदास सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यीकरण कामाचे थर्ड पार्टीचे बिल मंजूर करून काढून देण्याच्या कामाकरिता आरोपी देवीदास देशमुख याने ५ हजार ४00 रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंत ५ हजार रूपये देण्याचे मान्य केले. परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून आज २८ जून रोजी नगर पंचायत कुरखेडा सापडा रचून लाचखोर लिपिक देवीदास देशमुख यास ५ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश मदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.