१३ तलवारीसह निलागोंदीतील एका आरोपील गोंदिया पोलिसांनी घेतले ताब्यात

0
63

गोंदिया,दि.06ः जिल्हा पोलिसांनी दवनीवाडा पोलीस ठाणेंतर्गंत येत असलेल्य़ा निलागोंदी येथील एका इसमाच्या घरातून गुप्त माहितीच्या आधारे छापा घातला असता घरातून १३ तलवारी हस्तगत करीत आरोपीला ताब्य़ात घेतले आहे.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अवैध शस्त्र व हत्यार बाळगणार्याविरोधात शोदमोहिम राबवण्यात येत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खेमलाल बुधुलाल मसकरे यांच्याघरातील माजघरातून खाकी रंगाच्या खोक्यातून 13 नग लोखंडी तलवार आढळून आले.त्या आधारावर खेमलाल मसकरेला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर तलवारी या आपल्या भाच्याचा असल्याचे सांगितले.त्यावर पोलिसांनी मसकरे यांच्या भाच्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता आपणच तलवार आणल्याचे कबुल केल्याने खेमलाल मसकरे(वय 51,रा.निलागोंदी)सह विधीसंघर्ष बालक असलेल्या भाच्यास शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना अवैधरित्या विक्रीकरीता तलावर ठेवल्याने दवनीवाडा पोलीस ठाण्यात गु.र.क्र.198/2022 कलम 4,25 भारतीय हत्यार कायद्याअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.याप्रकरणात खेमलाल मसकरेला अटक कऱण्यात आली असून अधिक विचारपूस करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी दिली.सदर प्रकरणाचा पुढील तपास दवनीवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुखदेव राऊत करीत आहेत.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड,पोउपनि महेश विघ्ने,सोमेंद्रसिंग तुरकर,ओमेश्वर मेश्राम,अजय रहागंडाले,संतोष केदार व श्याम राठोड यांनी सहभाग घेत यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे अभिनंदन पोलीस अधिक्षकांनी केले.