33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता शिकारीसाठी शेतात दिला इलेक्ट्रिक करंट; शॉक लागून दोघांचा म्रुत्यू….

शिकारीसाठी शेतात दिला इलेक्ट्रिक करंट; शॉक लागून दोघांचा म्रुत्यू….

0
76

blank

देवरी:- दि.06 शिकारीसाठी शेतातील लोखंडी तारेला इलेक्ट्रीक करंट देण्यात आला होता. या तारेचा शॉक लागून दोघा इसमाचा म्रुत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.05) रात्री 11.45 वाजता सुमारास देवरी शहरालगद असलेल्या मोठा परसटोला परिसरात घडली आहे.

तर या घटनेत आशिष कोसरे वय २६ वर्ष, अनमोल गायकवाड वय २२ वर्षे दोघेही राहनार परसटोला (देवरी) असे म्रुत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी देवरी पोलिस्टेसनला फिर्याद दाखल करन्यात आली आहे.

सुत्रानीं दिलेल्या माहितीनुसार , शेतात शिकार करण्यासाठी लोखंडी तारेला इले्ट्रीक करंट दिला होता. रात्री शेतात गेलेल्या या दोघानां त्या तारेचा शॉक लागून त्यांचा म्रत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी देवरी पोलीस तपास करीत आहेत.

blank